S M L

आमदार डॉ. वसंत पवार यांचे निधन

7 ऑक्टोबरनाशिकचे आमदार डॉ. वसंत पवार यांचे आज विमानतच हृदयविकाराने निधन झाले. ते दिल्लीहून मुंबईला येत होते. याआधी 1991 ते 1996 या कालावधीत लोकसभेत खासदार म्हणून आणि विधानसभेत आमदार म्हणून त्यांची प्रदीर्घ कारकीर्द राहिली. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष, नाशिक साखर कारखान्याचे संचालक अशा महत्वाच्या पदांवर ते होते. नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. राजकीय कारकीर्दीसोबतच प्रख्यात सर्जन म्हणून नाशिकमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 4 एप्रिल 1948 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 04:05 PM IST

आमदार डॉ. वसंत पवार यांचे निधन

7 ऑक्टोबर

नाशिकचे आमदार डॉ. वसंत पवार यांचे आज विमानतच हृदयविकाराने निधन झाले. ते दिल्लीहून मुंबईला येत होते.

याआधी 1991 ते 1996 या कालावधीत लोकसभेत खासदार म्हणून आणि विधानसभेत आमदार म्हणून त्यांची प्रदीर्घ कारकीर्द राहिली. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष, नाशिक साखर कारखान्याचे संचालक अशा महत्वाच्या पदांवर ते होते.

नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. राजकीय कारकीर्दीसोबतच प्रख्यात सर्जन म्हणून नाशिकमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 4 एप्रिल 1948 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close