S M L

जळगावात बिबट्यासह दोन पिल्लांची शिकार

8 ऑक्टोबरजळगावला सातपुड्याच्या जंगलात एका बिबट्यासह दोन पिल्लांची शिकार झाल्याची घटना घडली आहे.सातपुड्यातील तिड्या तांड्याजवळ या बिबट्या मादीचे रक्त आणि तिच्या दोन पिल्लांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. पर्यावरणवादी संघटनांसह वनविभाग आणि पोलिसांनी आता सातपुड्याच्या जंगलात या घटनेचा शोध घेण्यासाठी संयुक्त कोबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. प्रचंड जंगलतोडीने डोंगर बोडका झाल्याने सातपुडा पर्वतराजीतील जंगलात राहणारी जनावरे आता गावाकडे येऊ लागली आहेत. तिड्या तांड्यापासून 8 किलोमीटर अंतरावर जंगलात ही घटना घडली आहे.सातपुड्यातील मारुळ आणि तिड्या गावांतील अनेकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या भागातील जवळपास 150 हेक्टर जंगल या संयुक्त मोहिमेत पिंजून काढण्यात आले आहे. वनविभागाच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या मोहिमेत भाग घेतला आहे. सातपुडा बचाव समितीने शोधलेले बिबट्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 10:37 AM IST

जळगावात बिबट्यासह दोन पिल्लांची शिकार

8 ऑक्टोबर

जळगावला सातपुड्याच्या जंगलात एका बिबट्यासह दोन पिल्लांची शिकार झाल्याची घटना घडली आहे.

सातपुड्यातील तिड्या तांड्याजवळ या बिबट्या मादीचे रक्त आणि तिच्या दोन पिल्लांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. पर्यावरणवादी संघटनांसह वनविभाग आणि पोलिसांनी आता सातपुड्याच्या जंगलात या घटनेचा शोध घेण्यासाठी संयुक्त कोबिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

प्रचंड जंगलतोडीने डोंगर बोडका झाल्याने सातपुडा पर्वतराजीतील जंगलात राहणारी जनावरे आता गावाकडे येऊ लागली आहेत. तिड्या तांड्यापासून 8 किलोमीटर अंतरावर जंगलात ही घटना घडली आहे.

सातपुड्यातील मारुळ आणि तिड्या गावांतील अनेकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या भागातील जवळपास 150 हेक्टर जंगल या संयुक्त मोहिमेत पिंजून काढण्यात आले आहे.

वनविभागाच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या मोहिमेत भाग घेतला आहे. सातपुडा बचाव समितीने शोधलेले बिबट्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close