S M L

रत्नागिरीत नवरात्रोत्सव सुरू

8 ऑक्टोबररत्नागिरीत आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. अनेक घरांमधून यावेळी देवीची पूजा करून घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेमध्ये नऊ प्रकारच्या धान्यांचे रुजवण मातीमध्ये घातले जाते. त्यावरील घटात पाणी भरून नऊ प्रकारच्या औषधी वनस्पतीही त्यात ठेवल्या जातात. रोज एक माळ या घटावर बांधली जाते आणि घटावरच्या ताम्हणात दुर्गादेवीच्या अनेक रुपांची प्रतिके म्हणून सुपार्‍या ठेवल्या जातात. याकडे समृध्दीला आवाहन करणारा उत्सव म्हणून पाहिले जाते. नवरात्रात आदीशक्तीच्या पूजनाने सर्व प्राणीमात्रांना जगण्याचे बळ मिळते, अशी येथील भाविकांची श्रध्दा आहे.औरंगाबादमध्ये घटस्थापनानवरात्रीच्या आज पहिल्या दिवशी औरंगाबादच्या कर्णपुरा देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. पहाटे 4 वाजता कर्णपुरा देवीला महास्नान घालून महाआरती पार पडली. नऊ दिवस चालणार्‍या या उत्सवामध्ये मराठवाड्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. शिवाय याठिकाणी यात्राही भरते. सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागतात. कर्णपुरा देवी स्थापनेचा इतिहास 1616 साला पासूनचा आहे. अनेक भक्तांचे कर्णपुरा देवी ही आराध्यदैवत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 11:25 AM IST

रत्नागिरीत नवरात्रोत्सव सुरू

8 ऑक्टोबर

रत्नागिरीत आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. अनेक घरांमधून यावेळी देवीची पूजा करून घटस्थापना करण्यात आली.

घटस्थापनेमध्ये नऊ प्रकारच्या धान्यांचे रुजवण मातीमध्ये घातले जाते. त्यावरील घटात पाणी भरून नऊ प्रकारच्या औषधी वनस्पतीही त्यात ठेवल्या जातात.

रोज एक माळ या घटावर बांधली जाते आणि घटावरच्या ताम्हणात दुर्गादेवीच्या अनेक रुपांची प्रतिके म्हणून सुपार्‍या ठेवल्या जातात.

याकडे समृध्दीला आवाहन करणारा उत्सव म्हणून पाहिले जाते. नवरात्रात आदीशक्तीच्या पूजनाने सर्व प्राणीमात्रांना जगण्याचे बळ मिळते, अशी येथील भाविकांची श्रध्दा आहे.

औरंगाबादमध्ये घटस्थापना

नवरात्रीच्या आज पहिल्या दिवशी औरंगाबादच्या कर्णपुरा देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली.

पहाटे 4 वाजता कर्णपुरा देवीला महास्नान घालून महाआरती पार पडली. नऊ दिवस चालणार्‍या या उत्सवामध्ये मराठवाड्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.

शिवाय याठिकाणी यात्राही भरते. सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागतात.

कर्णपुरा देवी स्थापनेचा इतिहास 1616 साला पासूनचा आहे. अनेक भक्तांचे कर्णपुरा देवी ही आराध्यदैवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close