S M L

कल्याण-डोंबिवलीतील मैदाने बकाल

अजित मांढरे, कल्याण 8 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मैदानांवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एकूण 6 मैदाने आहेत. या मैदानांचा पालिकेने अक्षरश: खेळ मांडला आहे. मैदानांवर अतिक्रमणे झाली असून ठिकठिकाणी कचरा साठला आहे. पालिकेच्या अनास्थेमुळे मैदाने बकाल झाली आहेत. महानगर पालिकेने दोन क्रीडासंकुले बांधायची ठरवली आहेत. एक कल्याणमध्ये तर एक डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीतील क्रीडासंकुल बांधून तयार आहे. पण त्याचे खाजगीकरण झाल्याने नागरिकांना त्याचे दर परवडत नाहीत. दुसरीकडे कल्याणमधील क्रीडासंकुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेच्या ताब्यातील क्रीडासंकुले एमसीएला चालवण्यासाठी द्यावीत, हा प्रस्तावही लाल फितीत अडकून पडला आहे. चांगली मैदाने आणि क्रीडा संकुले नसल्याने येथील खेळाडू इतर ठिकाणी खेळायला जातात. ही गोष्ट पालिकेला माहीत असतानाही पालिकेने पूर्ण दुर्लक्ष करणे हे येथील खेळाडूंचे दुदैर्व म्हणावे लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 12:03 PM IST

कल्याण-डोंबिवलीतील मैदाने बकाल

अजित मांढरे, कल्याण

8 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील मैदानांवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एकूण 6 मैदाने आहेत. या मैदानांचा पालिकेने अक्षरश: खेळ मांडला आहे.

मैदानांवर अतिक्रमणे झाली असून ठिकठिकाणी कचरा साठला आहे. पालिकेच्या अनास्थेमुळे मैदाने बकाल झाली आहेत.

महानगर पालिकेने दोन क्रीडासंकुले बांधायची ठरवली आहेत. एक कल्याणमध्ये तर एक डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीतील क्रीडासंकुल बांधून तयार आहे.

पण त्याचे खाजगीकरण झाल्याने नागरिकांना त्याचे दर परवडत नाहीत. दुसरीकडे कल्याणमधील क्रीडासंकुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

महापालिकेच्या ताब्यातील क्रीडासंकुले एमसीएला चालवण्यासाठी द्यावीत, हा प्रस्तावही लाल फितीत अडकून पडला आहे.

चांगली मैदाने आणि क्रीडा संकुले नसल्याने येथील खेळाडू इतर ठिकाणी खेळायला जातात.

ही गोष्ट पालिकेला माहीत असतानाही पालिकेने पूर्ण दुर्लक्ष करणे हे येथील खेळाडूंचे दुदैर्व म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close