S M L

नवेगाव उद्यानातील पुनर्वसन रेंगाळलेलेच

गोपाल मोटघरे, गोंदिया8 ऑक्टोबरगोंदीया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानात टायगर बफर झोन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश तयार करत आहेत. पण नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र आजही कायम आहे. एकीकडे जंगलातील हिंसक प्राणी, तर दुसरीकडे नक्षलवादी अशा दोघांना तोंड देत या गावातील लोक जगत आहेत. 1971 मध्ये नवेगावचे जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले. या उद्यानातील कवलेवाडा, कालीमाती, झकारगोदी, मणकाझरी आणि तुमढीमेढा या पाच गावांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. त्यामुळे ही गावे कधी रस्त्याशी जोडलीच गेली नाहीत. आजही या गावांतील मुलांना दहा - दहा किलोमीटर जंगलातून पायी चालून शाळेत जावे लागते.ही गावे राष्ट्रीय उद्यानात आहेत. दळणवळणाच्या कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. थोड्या फार शेतीशिवाय लोकांना रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांना जंगलात झाडे आणि बांबू कटाई करुन पोट भागवावे लागते.वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासधूसही नेहमीचीच. त्यामुळे गावकरी चिडून त्यांची शिकारही करतात.नागझिरा आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळेच टायगर बफर झोनचा प्रस्ताव जयराम रमेश यांनी ठेवला आहे. पण या पाच गावांच्या पुनर्वसनाशिवाय टायगर बफर झोन तयार करण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होणार , हा प्रश्नच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 12:57 PM IST

नवेगाव उद्यानातील पुनर्वसन रेंगाळलेलेच

गोपाल मोटघरे, गोंदिया

8 ऑक्टोबर

गोंदीया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानात टायगर बफर झोन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश तयार करत आहेत. पण नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र आजही कायम आहे. एकीकडे जंगलातील हिंसक प्राणी, तर दुसरीकडे नक्षलवादी अशा दोघांना तोंड देत या गावातील लोक जगत आहेत.

1971 मध्ये नवेगावचे जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले. या उद्यानातील कवलेवाडा, कालीमाती, झकारगोदी, मणकाझरी आणि तुमढीमेढा या पाच गावांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. त्यामुळे ही गावे कधी रस्त्याशी जोडलीच गेली नाहीत. आजही या गावांतील मुलांना दहा - दहा किलोमीटर जंगलातून पायी चालून शाळेत जावे लागते.

ही गावे राष्ट्रीय उद्यानात आहेत. दळणवळणाच्या कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. थोड्या फार शेतीशिवाय लोकांना रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांना जंगलात झाडे आणि बांबू कटाई करुन पोट भागवावे लागते.

वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासधूसही नेहमीचीच. त्यामुळे गावकरी चिडून त्यांची शिकारही करतात.

नागझिरा आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळेच टायगर बफर झोनचा प्रस्ताव जयराम रमेश यांनी ठेवला आहे. पण या पाच गावांच्या पुनर्वसनाशिवाय टायगर बफर झोन तयार करण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होणार , हा प्रश्नच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close