S M L

खेडमध्ये घरे जाळण्याचे प्रकार सुरूच

8 ऑक्टोबरपुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर गावामध्ये दहशत पसरली आहे. कारण चिंचबाई गावात निवडणुकीच्या वादातून चार घरे जाळण्याचा प्रकार घडला आहे. तेही चक्क पोलिसांच्या उपस्थितीत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले. पण तरीही काही दिवसांपासून घरांवर दगड मारणे, घरे पेटवून देणे नित्याचे झाले आहे. या घटनांची तक्रार पोलिसांत देऊनही अजून पंचनामाही झालेला नाही. मुख्य म्हणजे याच गावाला 2009 चा तंटामुक्ती अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 01:50 PM IST

खेडमध्ये घरे जाळण्याचे प्रकार सुरूच

8 ऑक्टोबर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर गावामध्ये दहशत पसरली आहे.

कारण चिंचबाई गावात निवडणुकीच्या वादातून चार घरे जाळण्याचा प्रकार घडला आहे.

तेही चक्क पोलिसांच्या उपस्थितीत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले.

पण तरीही काही दिवसांपासून घरांवर दगड मारणे, घरे पेटवून देणे नित्याचे झाले आहे.

या घटनांची तक्रार पोलिसांत देऊनही अजून पंचनामाही झालेला नाही.

मुख्य म्हणजे याच गावाला 2009 चा तंटामुक्ती अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close