S M L

महालक्ष्मी, तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

8 ऑक्टोबरसाडेतीन शक्तिपीठांपैकी एक स्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांमध्ये विधीवत घटाची पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीचीही घटस्थापनेसमोर विधीवत पूजा करण्यात आली. नवरात्रात श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतात.महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सुरवात आज घटस्थापनेने झाली.परंपरेप्रमाणे मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ही घटस्थापना करण्यात आली. घटस्थापना करण्यापूर्वी मंदिरातून ढोल, ताशे, संबळ वाजवत जिल्हाधिकार्‍यांनी गोमुख येथे ठेवलेल्या कलशाची पूजा करण्यासाठी मिरवणूक नेली. तसेच घटस्थापनेसाठी लागणारे तीर्थ कल्लोळातून आणि गोमुखातून आणण्यात आले. हा कल्लोळ तेथे पुरातन काळापासून तेथे आहे. ब्राम्हणांच्या हस्ते वैदीक मंत्रात कुंडाच्या पाण्याची पूजा करुन तसेच 5 प्रकारचे धान्य टाकून मंदिरात घटस्थापना करण्यात आली. या घटकस्थापनेनंतर नवरात्रीची सुरवात झाली, असे मानण्यात येते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 02:41 PM IST

महालक्ष्मी, तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

8 ऑक्टोबर

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक स्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना करण्यात आली.

त्यानंतर कोल्हापुरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांमध्ये विधीवत घटाची पूजा करुन घटस्थापना करण्यात आली.

त्यानंतर महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीचीही घटस्थापनेसमोर विधीवत पूजा करण्यात आली.

नवरात्रात श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतात.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सुरवात आज घटस्थापनेने झाली.

परंपरेप्रमाणे मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ही घटस्थापना करण्यात आली.

घटस्थापना करण्यापूर्वी मंदिरातून ढोल, ताशे, संबळ वाजवत जिल्हाधिकार्‍यांनी गोमुख येथे ठेवलेल्या कलशाची पूजा करण्यासाठी मिरवणूक नेली.

तसेच घटस्थापनेसाठी लागणारे तीर्थ कल्लोळातून आणि गोमुखातून आणण्यात आले.

हा कल्लोळ तेथे पुरातन काळापासून तेथे आहे.

ब्राम्हणांच्या हस्ते वैदीक मंत्रात कुंडाच्या पाण्याची पूजा करुन तसेच 5 प्रकारचे धान्य टाकून मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

या घटकस्थापनेनंतर नवरात्रीची सुरवात झाली, असे मानण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close