S M L

मुंबईत 250 बचतगटांना मिळणार रेशनिंग दुकाने

8 ऑक्टोबरमुंबईसह ठाण्यातील जवळपास 250 महिला बचत गटांना रेशनिंग दुकाने देण्यात येणार आहेत. जून 2009 मध्ये राज्य सरकारने यासंदर्भात जीआर काढला होता. पण याच्याविरोधात काही रेशनिंग दुकानदार संघटना कोर्टात गेल्या होत्या. आणि त्यांनी यावर स्टे आणला होता. परंतू राज्य सरकारने सुप्रिम कोर्टातून यावरील स्टे रद्द करून महिला बचत गटांना रेशनिंग दुकान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपर्यत महिला बचतगटांची रेशनिंग दुकाने सुरू होणार असल्याचे रेशन अधिकारी सांगत आहेत.तर दुसरीकडे रेशनिंग दुकानदारांना कमिशन मिळत नसल्याच्या विरोधात बर्‍याच रेशनिंग संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 05:12 PM IST

मुंबईत 250 बचतगटांना मिळणार रेशनिंग दुकाने

8 ऑक्टोबर

मुंबईसह ठाण्यातील जवळपास 250 महिला बचत गटांना रेशनिंग दुकाने देण्यात येणार आहेत. जून 2009 मध्ये राज्य सरकारने यासंदर्भात जीआर काढला होता. पण याच्याविरोधात काही रेशनिंग दुकानदार संघटना कोर्टात गेल्या होत्या. आणि त्यांनी यावर स्टे आणला होता.

परंतू राज्य सरकारने सुप्रिम कोर्टातून यावरील स्टे रद्द करून महिला बचत गटांना रेशनिंग दुकान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपर्यत महिला बचतगटांची रेशनिंग दुकाने सुरू होणार असल्याचे रेशन अधिकारी सांगत आहेत.

तर दुसरीकडे रेशनिंग दुकानदारांना कमिशन मिळत नसल्याच्या विरोधात बर्‍याच रेशनिंग संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close