S M L

स्फोटपीडित विद्यार्थ्यांना मदत

9 ऑक्टोबरगडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र - छत्तीसगढ सीमेजवळ नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत काल दोन शाळकरी मुलांचा नाहक बळी गेला होता. शाळेच्या आवारात ग्रेनेड पडून स्फोट झाला आणि ही घटना घडली. या घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील हे आज गडचिरोलीत दाखल झालेत. त्यांनी या शाळेतील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच ग्रेनेड स्फोटात मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर जखमींना 75 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा हॉस्पिटलमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकार्‍यांबरोबर बैठकही केली. गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेल्या पोलिसांनी 4 दिवसात रुजू व्हावे, अन्यथा या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे. या कर्मचार्‍यांना निलंबन पत्र देण्याचीही गरज नाही. जवळपास 140 पोलिसांची गडचिरोली जिल्ह्यात बदली झाली आहे. मात्र केवळ 35 पोलीसच जिल्ह्यात रुजू झाले आहेत. अजूनही 105 कर्मचारी जिल्ह्यात रुजू झालेले नाहीत. त्यांना आर. आर. पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 11:46 AM IST

स्फोटपीडित विद्यार्थ्यांना मदत

9 ऑक्टोबर

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र - छत्तीसगढ सीमेजवळ नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत काल दोन शाळकरी मुलांचा नाहक बळी गेला होता.

शाळेच्या आवारात ग्रेनेड पडून स्फोट झाला आणि ही घटना घडली. या घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील हे आज गडचिरोलीत दाखल झालेत. त्यांनी या शाळेतील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली.

तसेच ग्रेनेड स्फोटात मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर जखमींना 75 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी केली.

त्यांनी पहिल्यांदा हॉस्पिटलमधील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकार्‍यांबरोबर बैठकही केली. गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेल्या पोलिसांनी 4 दिवसात रुजू व्हावे, अन्यथा या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे.

या कर्मचार्‍यांना निलंबन पत्र देण्याचीही गरज नाही. जवळपास 140 पोलिसांची गडचिरोली जिल्ह्यात बदली झाली आहे. मात्र केवळ 35 पोलीसच जिल्ह्यात रुजू झाले आहेत. अजूनही 105 कर्मचारी जिल्ह्यात रुजू झालेले नाहीत. त्यांना आर. आर. पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close