S M L

कॉलेजमधून काढण्याच्या भीतीने आत्महत्या

8 ऑक्टोबरजातीचा दाखला नसल्याने कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल, या भीतीने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. त्याच्या आत्महत्येला तहसिल कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. वर्तक विद्यालयात 11 वीत शिकणार्‍या शैलेंद्र रमाकांत सुरूंदा याने साडेतीन महिन्यांपूर्वी वसई तहसील कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता.जातीचा दाखला नसल्याने त्याला कॉलेजमधून काढण्यात येणार होते. त्यासाठी तहसिल कार्यालयात त्याने आपली व्यथा सांगितली होती. तरीही प्रशासनाने त्याला जातीचा दाखला देण्यास टाळाटाळ केली. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर शैलेशने गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात तहसिल कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तहसिलदार विश्वास गुजर यांनी कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला. तर आमदार विवेक पंडित यांनी हे प्रकरण आदिवासी विकासमंत्र्यांपर्यंत नेऊन दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 12:26 PM IST

कॉलेजमधून काढण्याच्या भीतीने आत्महत्या

8 ऑक्टोबर

जातीचा दाखला नसल्याने कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल, या भीतीने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना वसईमध्ये घडली आहे.

त्याच्या आत्महत्येला तहसिल कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. वर्तक विद्यालयात 11 वीत शिकणार्‍या शैलेंद्र रमाकांत सुरूंदा याने साडेतीन महिन्यांपूर्वी वसई तहसील कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता.

जातीचा दाखला नसल्याने त्याला कॉलेजमधून काढण्यात येणार होते. त्यासाठी तहसिल कार्यालयात त्याने आपली व्यथा सांगितली होती. तरीही प्रशासनाने त्याला जातीचा दाखला देण्यास टाळाटाळ केली. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर शैलेशने गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

यासंदर्भात तहसिल कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तहसिलदार विश्वास गुजर यांनी कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला. तर आमदार विवेक पंडित यांनी हे प्रकरण आदिवासी विकासमंत्र्यांपर्यंत नेऊन दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close