S M L

कविता राऊतला अडीच लाखांचे बक्षीस

9 ऑक्टोबरकॉमनवेल्थ स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये ब्राँझ मेडल पटकावणार्‍या महाराष्ट्राच्या कविता राऊतला राज्य सरकारतर्फे अडीच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागातर्फे हे बक्षीस जाहीर करण्यात आले. वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज कविताच्या गावी नाशिकमध्ये ही घोषणा केली. कविताने काल झालेल्या दहा किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझ मेडलची कमाई केली होती. या कॉमनवेल्थमध्ये ऍथलेटिक्समधील हे भारताचे पहिले मेडल ठरले. तर गेल्या 50 वर्षांत ऍथलेटिक्समध्ये भारतीय महिलेने पहिल्यांदाच मेडल मिळवले. त्यामुळे कवितावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कविता सध्या दिल्लीत आहे. आणि ती नाशिकला परतल्यावर बबनराव पाचपुतेंच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येणार आहे. कविता राऊत राहत असलेल्या नाशिकमधील तिच्या गावामध्ये या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. या यशासाठी तिने खूप कष्ट केल्याची भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 04:18 PM IST

कविता राऊतला अडीच लाखांचे बक्षीस

9 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये ब्राँझ मेडल पटकावणार्‍या महाराष्ट्राच्या कविता राऊतला राज्य सरकारतर्फे अडीच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागातर्फे हे बक्षीस जाहीर करण्यात आले.

वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज कविताच्या गावी नाशिकमध्ये ही घोषणा केली. कविताने काल झालेल्या दहा किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझ मेडलची कमाई केली होती.

या कॉमनवेल्थमध्ये ऍथलेटिक्समधील हे भारताचे पहिले मेडल ठरले. तर गेल्या 50 वर्षांत ऍथलेटिक्समध्ये भारतीय महिलेने पहिल्यांदाच मेडल मिळवले. त्यामुळे कवितावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कविता सध्या दिल्लीत आहे. आणि ती नाशिकला परतल्यावर बबनराव पाचपुतेंच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येणार आहे.

कविता राऊत राहत असलेल्या नाशिकमधील तिच्या गावामध्ये या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. या यशासाठी तिने खूप कष्ट केल्याची भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close