S M L

विश्वशांती यज्ञावरून कोल्हपुरात वातावरण तापलं

29 ऑक्टोबर, कोल्हापूरब्युरो रिपोर्टकोल्हापूर शहरात नोव्हेंबरमध्ये होणार्‍या विश्‍वशांती महायज्ञाला होणारा विरोध आता वाढू लागला आहे. काल कोल्हापुरात यज्ञाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्यानं काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सर्वोदय मंडळानं यज्ञस्थळावर आंदोलन छेडलं. मात्र शिवसेना, भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी या आंदोलनाला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेनं गांधी मैदानावर सुरू असलेल्या यज्ञाच्या कामाला काही काळ स्थगिती दिली आहे. ' यज्ञ शांततेत पार पडला असता तर त्याला कोणी विरोध केला नसता.आम्हीही कर्मकांड मानणारे नसल्याने इकडे फिरकलोही नसतो. कोणीही यावं आणि हिंदू धर्मावर काठी उगारावी हे आम्ही पण सहन करणार नाही अशी ' प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. '

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2008 07:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2008 07:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close