S M L

भारताकडून 300 रन्सचा टप्पा पार

11 ऑक्टोबरबंगलोर टेस्टमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 300 रन्सचा टप्पा पार केला आहे. मुरली विजयने शानदार सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट क्रिकेटमधील ही त्याची पहिलीच सेंच्युरी ठरली आहे. 2008ला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या मुरली विजयची ही सातवी टेस्ट आहे. सेंच्युरीबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरसह तिसर्‍या विकेटसाठी 250हून अधिक रन्सची पार्टनरशिपही केली. टेस्ट क्रिकेटमध्ये 49 सेंच्युरी करणार्‍या सचिन तेंडुलकरचीही डबल सेंच्युरीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये आता 175 रन्सने पिछाडीवर आहे.प्रतीक्षा सेंच्युरीच्या हाफ सेंच्युरीची सेंच्युरीची हाफ सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी सचिनला आता फक्त एका सेंच्युरीची गरज आहे. तर सर्वाधिक सेंच्युरीच्या यादीत सचिन आता रिकी पाँटिंगपेक्षा 10 सेंच्युरीने पुढे आहे. रिकी पाँटिंगने 148 टेस्ट मॅचमध्ये 39 सेंच्युरी केल्यात. या यादीत तिसरा आहे तो दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस. 140 टेस्टमध्ये त्याने 35 सेंच्युरी केल्यात. त्यानंतर सर्वाधिक टेस्ट सेंच्युरीच्या यादीत लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा नंबर लागतो. 125 टेस्ट मॅचमध्ये त्यांच्या नावावर 34 सेंच्युरी आहेत. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावरही 131 टेस्टमध्ये 34 सेंच्युरी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 10:29 AM IST

भारताकडून 300 रन्सचा टप्पा पार

11 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 300 रन्सचा टप्पा पार केला आहे. मुरली विजयने शानदार सेंच्युरी ठोकली आहे.

टेस्ट क्रिकेटमधील ही त्याची पहिलीच सेंच्युरी ठरली आहे. 2008ला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या मुरली विजयची ही सातवी टेस्ट आहे.

सेंच्युरीबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरसह तिसर्‍या विकेटसाठी 250हून अधिक रन्सची पार्टनरशिपही केली.

टेस्ट क्रिकेटमध्ये 49 सेंच्युरी करणार्‍या सचिन तेंडुलकरचीही डबल सेंच्युरीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये आता 175 रन्सने पिछाडीवर आहे.

प्रतीक्षा सेंच्युरीच्या हाफ सेंच्युरीची

सेंच्युरीची हाफ सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी सचिनला आता फक्त एका सेंच्युरीची गरज आहे.

तर सर्वाधिक सेंच्युरीच्या यादीत सचिन आता रिकी पाँटिंगपेक्षा 10 सेंच्युरीने पुढे आहे.

रिकी पाँटिंगने 148 टेस्ट मॅचमध्ये 39 सेंच्युरी केल्यात. या यादीत तिसरा आहे तो दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस. 140 टेस्टमध्ये त्याने 35 सेंच्युरी केल्यात.

त्यानंतर सर्वाधिक टेस्ट सेंच्युरीच्या यादीत लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा नंबर लागतो.

125 टेस्ट मॅचमध्ये त्यांच्या नावावर 34 सेंच्युरी आहेत. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावरही 131 टेस्टमध्ये 34 सेंच्युरी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close