S M L

एकविरा आईच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल

गणेश वायकर, लोणावळा11 ऑक्टोबरदुर्गा देवीच्या बहुतांश स्थानांमधील साम्य म्हणजे ही स्थाने डोंगराच्या कडेकपार्‍यांत वसलेली आहेत. असेच एक स्थान म्हणजे कार्ल्याच्या गडावर वसलेली एकविरा आई. सध्या नवरात्रीसाठी लाखो भाविक इथे दाखल झाले आहेत. लोणावळ्यापासून अवघ्या 12 किलोमीटरवर कार्ल्याच्या गडावर हे एकविरा आईचे मंदिर वसलेले आहे. अठरा पगड जमातीची कुलस्वामिनी असणार्‍या देवीचा हा गड म्हणजे आगरी कोळ्याची पंढरीच. मंदिराच्या उभारणीचा निश्चित कालावधी सापडत नाही. मात्र मंदिरात असलेल्या एका शिलालेखावर 1866 साली या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.सगळ्यांचे रक्षण करणार्‍या एकविरा आईची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. पारंपरिक दागिन्यांचा साज चढवलेली ही मूर्ती इथे येणार्‍या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालते. गाभार्‍यातील मूर्ती ही स्वयंभू आहे. देवीच्या अंगावर शेंदुराचा लेप चढवण्यात आला आहे. नवरात्री निमित्त सध्या गडावर उत्सव सुरू आहे. ढोल ताशांच्या आणि नगार्‍याच्या तालावर गडाचा परिसर दुमदुमून गेला आहे. आतापर्यंत अंदाजे 3 लाख भाविकांनी एकविरा आईचे दर्शन घेतले आहे. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 10:40 AM IST

एकविरा आईच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल

गणेश वायकर, लोणावळा

11 ऑक्टोबर

दुर्गा देवीच्या बहुतांश स्थानांमधील साम्य म्हणजे ही स्थाने डोंगराच्या कडेकपार्‍यांत वसलेली आहेत.

असेच एक स्थान म्हणजे कार्ल्याच्या गडावर वसलेली एकविरा आई. सध्या नवरात्रीसाठी लाखो भाविक इथे दाखल झाले आहेत.

लोणावळ्यापासून अवघ्या 12 किलोमीटरवर कार्ल्याच्या गडावर हे एकविरा आईचे मंदिर वसलेले आहे.

अठरा पगड जमातीची कुलस्वामिनी असणार्‍या देवीचा हा गड म्हणजे आगरी कोळ्याची पंढरीच. मंदिराच्या उभारणीचा निश्चित कालावधी सापडत नाही.

मात्र मंदिरात असलेल्या एका शिलालेखावर 1866 साली या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

सगळ्यांचे रक्षण करणार्‍या एकविरा आईची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. पारंपरिक दागिन्यांचा साज चढवलेली ही मूर्ती इथे येणार्‍या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालते.

गाभार्‍यातील मूर्ती ही स्वयंभू आहे. देवीच्या अंगावर शेंदुराचा लेप चढवण्यात आला आहे. नवरात्री निमित्त सध्या गडावर उत्सव सुरू आहे.

ढोल ताशांच्या आणि नगार्‍याच्या तालावर गडाचा परिसर दुमदुमून गेला आहे. आतापर्यंत अंदाजे 3 लाख भाविकांनी एकविरा आईचे दर्शन घेतले आहे. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close