S M L

सचिनने मोडला लाराचा विक्रम

11 ऑक्टोबरबंगलोर टेस्टमध्ये सचिनने आणखी एक रेकॉर्ड मागे टाकला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 रन्स करण्याचा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. लाराच्या नावावर 19वेळा हा रेकॉर्ड होता. तर सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 20 वेळा 150 रन्स केलेत. त्याआधी त्याने शानदार सेंच्युरी ठोकत टेस्टमधील आपली 49 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे. 2 सिक्स आणि 15 फोर ठोकत सचिनने ही शानदार सेंच्युरी ठोकली आहे. 93 रनवर असताना सचिनने ह्युरित्झला जोरदार सिक्स लगावली. आणि तो सेंच्युरीच्या जवळ पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा सिक्स मारुन त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. चिन्नास्वामी स्टेडियम सचिनसाठी पुन्हा एकदा लकी ठरले आहे. खासकरुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध या स्टेडियमवर त्याची कामगिरी सुरेख झाली आहे. चिन्नास्वामीवर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही तिसरी सेंच्युरी ठोकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 11:28 AM IST

सचिनने मोडला लाराचा विक्रम

11 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टमध्ये सचिनने आणखी एक रेकॉर्ड मागे टाकला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 रन्स करण्याचा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे.

लाराच्या नावावर 19वेळा हा रेकॉर्ड होता. तर सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 20 वेळा 150 रन्स केलेत. त्याआधी त्याने शानदार सेंच्युरी ठोकत टेस्टमधील आपली 49 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे.

2 सिक्स आणि 15 फोर ठोकत सचिनने ही शानदार सेंच्युरी ठोकली आहे. 93 रनवर असताना सचिनने ह्युरित्झला जोरदार सिक्स लगावली.

आणि तो सेंच्युरीच्या जवळ पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा सिक्स मारुन त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.

चिन्नास्वामी स्टेडियम सचिनसाठी पुन्हा एकदा लकी ठरले आहे. खासकरुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध या स्टेडियमवर त्याची कामगिरी सुरेख झाली आहे.

चिन्नास्वामीवर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही तिसरी सेंच्युरी ठोकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close