S M L

ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा

11 ऑक्टोबरशेतकर्‍याच्या उसाला योग्य भाव मिळाला नाही तर उसाचा हंगाम सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सध्या सुरू असलेले साखर कारखाने आणि त्याची गाळप क्षमता लक्षात घेता एप्रिलनंतर एकही साखर कारखाना सुरू राहू शकणार नाही. तरीही राज्य सरकार हंगाम सुरू होण्याआगोदर शिल्लक उसाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे. सरकारची ही घोषणा शेतकर्‍यांची दिशाभूल करणारी आहे, असेही खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 15 ऑक्टोबरला स्वाभिमान संघटना यासाठी आंदोलन करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 02:17 PM IST

ऊसदरासाठी आंदोलनाचा इशारा

11 ऑक्टोबर

शेतकर्‍याच्या उसाला योग्य भाव मिळाला नाही तर उसाचा हंगाम सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सध्या सुरू असलेले साखर कारखाने आणि त्याची गाळप क्षमता लक्षात घेता एप्रिलनंतर एकही साखर कारखाना सुरू राहू शकणार नाही. तरीही राज्य सरकार हंगाम सुरू होण्याआगोदर शिल्लक उसाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

सरकारची ही घोषणा शेतकर्‍यांची दिशाभूल करणारी आहे, असेही खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 15 ऑक्टोबरला स्वाभिमान संघटना यासाठी आंदोलन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close