S M L

वीज वितरण कार्यालयावर बाभळेश्‍वरमध्ये दगडफेक

11 ऑक्टोबरअहमदनगर जिल्ह्यातील बाभळेश्वर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता, श्रीरामपूर आणि राहुरी या 3 तालुक्यातील गावांना मुळा - प्रवरा वीज संस्था विद्युत पुरवठा करते. मुळा - प्रवरा या संस्थेला वीजवितरण कंपनीकडून कमी वीज दिली जात असल्याने प्रमाणापेक्षा जास्त भारनियमन 187 गावांमध्ये केले जात आहे. त्यामुळे लोडशेडींगच्या विरोधात आज सर्व गावातील नागरिकांनी गावबंद तसेच विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीमार केला. 200 ते 300 लोकांचा जमाव इथे जमला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 10:58 AM IST

वीज वितरण कार्यालयावर बाभळेश्‍वरमध्ये दगडफेक

11 ऑक्टोबर

अहमदनगर जिल्ह्यातील बाभळेश्वर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहता, श्रीरामपूर आणि राहुरी या 3 तालुक्यातील गावांना मुळा - प्रवरा वीज संस्था विद्युत पुरवठा करते.

मुळा - प्रवरा या संस्थेला वीजवितरण कंपनीकडून कमी वीज दिली जात असल्याने प्रमाणापेक्षा जास्त भारनियमन 187 गावांमध्ये केले जात आहे.

त्यामुळे लोडशेडींगच्या विरोधात आज सर्व गावातील नागरिकांनी गावबंद तसेच विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.

तर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी सौम्य लाठीमार केला. 200 ते 300 लोकांचा जमाव इथे जमला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close