S M L

डोंबिवली शिवसेनेत बंडखोरी

13 ऑक्टोबरडोंबिवलीमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना तिकीट दिले गेले नाही म्हणून ते नाराज होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांनीही राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या या सर्वपदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवले आहेत.अर्ज भरण्याचा शेवटचा दिवसकल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कल्याण डोंबिवली महपालिकेसाठी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. तर शिवसेना आणि भाजपचीही युती आहे. तर मनसेने 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे नाराजांनी बंडखोरी करु नये, यासाठी सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 11:09 AM IST

डोंबिवली शिवसेनेत बंडखोरी

13 ऑक्टोबर

डोंबिवलीमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना तिकीट दिले गेले नाही म्हणून ते नाराज होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांनीही राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या या सर्वपदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवले आहेत.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कल्याण डोंबिवली महपालिकेसाठी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. तर शिवसेना आणि भाजपचीही युती आहे.

तर मनसेने 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे नाराजांनी बंडखोरी करु नये, यासाठी सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close