S M L

खराब रस्ते असूनही नंदूरबारमध्ये टोलवसुली

14 ऑक्टोबरसरकार म्हणते की खड्डे असतील तर टोल देऊ नका... पण नंदुरबारमध्ये मात्र रस्ते नाहीत तरीही टोल वसूल केला जात आहे. याविरोधात आज नंदूरबारमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. कालच ट्रक युनियनने संप केला. तसेच, स्थानिक आणि लोकप्रतिनिधीही त्याबद्दल नाराज व्यक्त केली होती. नंदुरबार शहरात तब्बल आठ ठिकाणी टोलटॅक्स लागू करण्यात आला आहे. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत ही वसुली करण्यात येत आहे. प्रत्यक्षात फक्त 2 उड्डाणपूल बांधण्यात आलेत आणि रस्ते दुरुस्तीचा पत्ताच नाही. त्यामुळेच आज बंद पुकारण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2010 12:38 PM IST

खराब रस्ते असूनही नंदूरबारमध्ये टोलवसुली

14 ऑक्टोबर

सरकार म्हणते की खड्डे असतील तर टोल देऊ नका... पण नंदुरबारमध्ये मात्र रस्ते नाहीत तरीही टोल वसूल केला जात आहे.

याविरोधात आज नंदूरबारमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. कालच ट्रक युनियनने संप केला. तसेच, स्थानिक आणि लोकप्रतिनिधीही त्याबद्दल नाराज व्यक्त केली होती.

नंदुरबार शहरात तब्बल आठ ठिकाणी टोलटॅक्स लागू करण्यात आला आहे. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत ही वसुली करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात फक्त 2 उड्डाणपूल बांधण्यात आलेत आणि रस्ते दुरुस्तीचा पत्ताच नाही. त्यामुळेच आज बंद पुकारण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2010 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close