S M L

दसरा सण मोठा

17 ऑक्टोंबरआज विजयादशमी अर्थात दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस. नविन कामाला सुरवात करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हा दिवस.याच दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करुन दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो असा समज आहे. आजच्या दिवसी घरातल्या वस्तुंची पुजा केली जाते. अनेक जण नव्या घरात प्रवेश करतात.सोने खरेदी करतात. संध्याकाळी आपट्याची पाने वाटुन ज्येष्ठांचेआशिर्वाद घेतात. शेतकरी, कारागीर देखील आजच्या दिवशी आयुधांची हत्यारांची पुजा करुन नव्या दिवसाची सुरवात करतात.तुळजापूरात तुळजाभवानी देवी सीमोल्लंघनदसर्‍याच्या दिवशी तुळजापूरात तुळजाभवानी देवी सीमोल्लंघन करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिराच्या बाहेर पडते. गेली नऊ दिवस देवी महिशासुरा बरोबर युद्ध खेळत होती. देवीने महिशासुराचा वध केला, त्याचा जल्लोष क रण्यासाठी देवी मंदिराबाहेर पडते. देवीच्या या मिरवणूकीसाठी पूर्वजात मान असणार्‍या नगरचे भगत लोक देवीसाठी खास पालखी बनवून घेऊन येतात. या पालखीतूनच देवीची मिरवणूक काढली जाते.मिरवणूकीनंतर नगरच्याच लोकांच्या हाताने पालखी मोडली जाते. या सर्व मिरवणूकीनंतर तुळजाभवानी पुढल्या पाच दिवस निद्रावस्थेत जाते. या दरम्यान भक्तांना देवीच्या गाभार्‍याचं दर्शन दिले जाते. महिशासुराचा वध करुन दमलेली देवी कोजागिरी पौर्णिमेलाचं उठते अशी आख्यायिका सांगतली जाते. सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दीसोन्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे तरीही सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. कोल्हापूरातही सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे.जळगांवतील मेहरुण तलावदसर्‍याच्या दिवशी अनेक गावांत रावणाच्या पुतळ्याचं दहन केले जाते. जळगांवतही दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर दशानंद रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार सायंकाळी 7 च्या सुमारांस या पुतळ्याचे दहन करतील.या वेळी आयोजकांकडून केली जाणारी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी जळगावकार मोठ्या संख्येनं गर्दी करतात. कोल्हापूरात बैल सजावटीच्या अनोख्या स्पर्धा आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. पण दसर्‍याच्या मुहुर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील तारळे इथे बैल सजावटीच्या अनोख्या स्पर्धा भरवल्या जातात. कसबा तारळे इथल्या दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीन ह्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहे. रोप लावणीच्या कामानंतर बैलाना दोन महिने विश्रांती मिळते. दसर्‍यानंतर पुन्हा शेतीच्या कामाला जोमाने सुरवात होते. त्यामुळे शेती कामाआधी कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजा आपल्या बैलांना सजवुन त्यांची गावातुन मिरवणुक काढतात.आणि त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी सगळे बैल एकत्र येतात. त्यानंतर यातील सदृढ आणि आकर्षक सजावटीच्या बैलाना बक्षीस दिले जाते. कोकणात शेतक-यांचा दसरा कोकणातल्या शेतक-यांचा दसरा हा नव्या भाताच्या पिकाची बांधणी घराला बांधून आणि शेतीच्या अवजारांची पूजा करून साजरा केला जातो. घराच्या दाराला तोरण बांधण्यासाठी नाचणी , वरी , कुर्डू आणि भाताच्या पिकाची केसरं तोडून ती आंब्याच्या पानांमध्ये गुंफ़ली जातात आणि झेंडूच्या फ़ुलांनी हे तोरण सजवले जाते. त्यानंतर शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते.दस-याला नव्या पिकाचे तोरण बांधल्याशिवाय हे पिक शेतकरी वापरायला घेत नाहीत.आणि दारावर बांधलेले हे तोरण शेतीची ओळख म्हणून पुढच्या दस-यापर्यंत तसच ठेवण्यात येते. ह्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचे पिकही चांगले आलेआहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 11:54 AM IST

दसरा सण मोठा

17 ऑक्टोंबर

आज विजयादशमी अर्थात दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस. नविन कामाला सुरवात करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हा दिवस.याच दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करुन दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो असा समज आहे.

आजच्या दिवसी घरातल्या वस्तुंची पुजा केली जाते. अनेक जण नव्या घरात प्रवेश करतात.सोने खरेदी करतात.

संध्याकाळी आपट्याची पाने वाटुन ज्येष्ठांचेआशिर्वाद घेतात. शेतकरी, कारागीर देखील आजच्या दिवशी आयुधांची हत्यारांची पुजा करुन नव्या दिवसाची सुरवात करतात.

तुळजापूरात तुळजाभवानी देवी सीमोल्लंघन

दसर्‍याच्या दिवशी तुळजापूरात तुळजाभवानी देवी सीमोल्लंघन करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिराच्या बाहेर पडते.

गेली नऊ दिवस देवी महिशासुरा बरोबर युद्ध खेळत होती. देवीने महिशासुराचा वध केला, त्याचा जल्लोष क रण्यासाठी देवी मंदिराबाहेर पडते.

देवीच्या या मिरवणूकीसाठी पूर्वजात मान असणार्‍या नगरचे भगत लोक देवीसाठी खास पालखी बनवून घेऊन येतात.

या पालखीतूनच देवीची मिरवणूक काढली जाते.मिरवणूकीनंतर नगरच्याच लोकांच्या हाताने पालखी मोडली जाते.

या सर्व मिरवणूकीनंतर तुळजाभवानी पुढल्या पाच दिवस निद्रावस्थेत जाते. या दरम्यान भक्तांना देवीच्या गाभार्‍याचं दर्शन दिले जाते.

महिशासुराचा वध करुन दमलेली देवी कोजागिरी पौर्णिमेलाचं उठते अशी आख्यायिका सांगतली जाते.

सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी

सोन्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे तरीही सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. कोल्हापूरातही सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे.

जळगांवतील मेहरुण तलाव

दसर्‍याच्या दिवशी अनेक गावांत रावणाच्या पुतळ्याचं दहन केले जाते. जळगांवतही दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर दशानंद रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे.

पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार सायंकाळी 7 च्या सुमारांस या पुतळ्याचे दहन करतील.या वेळी आयोजकांकडून केली जाणारी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी जळगावकार मोठ्या संख्येनं गर्दी करतात.

कोल्हापूरात बैल सजावटीच्या अनोख्या स्पर्धा

आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. पण दसर्‍याच्या मुहुर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील तारळे इथे बैल सजावटीच्या अनोख्या स्पर्धा भरवल्या जातात.

कसबा तारळे इथल्या दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीन ह्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहे.

रोप लावणीच्या कामानंतर बैलाना दोन महिने विश्रांती मिळते. दसर्‍यानंतर पुन्हा शेतीच्या कामाला जोमाने सुरवात होते.

त्यामुळे शेती कामाआधी कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजा आपल्या बैलांना सजवुन त्यांची गावातुन मिरवणुक काढतात.आणि त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी सगळे बैल एकत्र येतात.

त्यानंतर यातील सदृढ आणि आकर्षक सजावटीच्या बैलाना बक्षीस दिले जाते.

कोकणात शेतक-यांचा दसरा

कोकणातल्या शेतक-यांचा दसरा हा नव्या भाताच्या पिकाची बांधणी घराला बांधून आणि शेतीच्या अवजारांची पूजा करून साजरा केला जातो.

घराच्या दाराला तोरण बांधण्यासाठी नाचणी , वरी , कुर्डू आणि भाताच्या पिकाची केसरं तोडून ती आंब्याच्या पानांमध्ये गुंफ़ली जातात आणि झेंडूच्या फ़ुलांनी हे तोरण सजवले जाते.

त्यानंतर शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते.दस-याला नव्या पिकाचे तोरण बांधल्याशिवाय हे पिक शेतकरी वापरायला घेत नाहीत.आणि दारावर बांधलेले हे तोरण शेतीची ओळख म्हणून पुढच्या दस-यापर्यंत तसच ठेवण्यात येते.

ह्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे भाताचे पिकही चांगले आलेआहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close