S M L

हिंगोलीतला ऐतहासिक दसरा महोत्सव

17 ऑक्टोंबरहिंगोलीचा दसरा महोत्सव म्हणजे मोठ्या आकर्षणाचा विषय आहे. यंदा हा दसरा महोत्सव 157 वर्षांचा झाला आहे. संत मानादास बाबा यांनी 1885 साली या दसरा महोत्सवाचा श्रीगणेशा केला. 157 वर्षांनंतरही या महोत्सवाची झळाळी आणि त्यातला उत्साह मात्र आजही कायम आहे.हिंगोलीतला दसरा 1853 साली निझामाच्या ऐतिहासिक काळात या महोत्सवाची सुरुवात झाली. हिंगोलीच्या खाकी बाबा संस्थानातल्या संत मानादास बाबा यांनी त्याची सुरुवात केली. घटस्थापनेपासूनच इथल्या दसरा महोत्सवाला सुरुवात होते. दोन दिवस हा महोत्सव चालतो. विविध प्रकारच्या मूर्ती हे या दसरा महोत्सवाचे आकर्षण असते. सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या समितीच्या प्रदर्शनात लोक गर्दी करतात. इथं सर्वजण आपल्या कुटुंबासह येऊन तिथल्या उत्साहाचा आनंद घेतात.मानादास बाबांनी 1853 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज कल्पवृक्षात रुपांतर झाले आहे. 157 वर्षानंतर हिंगोलीचा दसरा आजही आपले नावलौकिक कायम ठेवून आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2010 11:54 AM IST

हिंगोलीतला ऐतहासिक दसरा महोत्सव

17 ऑक्टोंबर

हिंगोलीचा दसरा महोत्सव म्हणजे मोठ्या आकर्षणाचा विषय आहे. यंदा हा दसरा महोत्सव 157 वर्षांचा झाला आहे.

संत मानादास बाबा यांनी 1885 साली या दसरा महोत्सवाचा श्रीगणेशा केला. 157 वर्षांनंतरही या महोत्सवाची झळाळी आणि त्यातला उत्साह मात्र आजही कायम आहे.

हिंगोलीतला दसरा 1853 साली निझामाच्या ऐतिहासिक काळात या महोत्सवाची सुरुवात झाली.

हिंगोलीच्या खाकी बाबा संस्थानातल्या संत मानादास बाबा यांनी त्याची सुरुवात केली.

घटस्थापनेपासूनच इथल्या दसरा महोत्सवाला सुरुवात होते. दोन दिवस हा महोत्सव चालतो.

विविध प्रकारच्या मूर्ती हे या दसरा महोत्सवाचे आकर्षण असते.

सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या समितीच्या प्रदर्शनात लोक गर्दी करतात. इथं सर्वजण आपल्या कुटुंबासह येऊन तिथल्या उत्साहाचा आनंद घेतात.

मानादास बाबांनी 1853 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज कल्पवृक्षात रुपांतर झाले आहे. 157 वर्षानंतर हिंगोलीचा दसरा आजही आपले नावलौकिक कायम ठेवून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close