S M L

विश्वनाथ आनंद वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या मार्गावर

29 ऑक्टोबरसंजय सुरीवर्ल्ड चॅम्पियनचा ताज पून्हा एकदा आपल्या नावावर करण्यासाठी भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आता सज्ज झाला आहे. आनंदला सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनायला आता फक्त अर्ध्या पॉइंटची गरज आहे. पण प्रश्न असा आहे की आनंदचा कट्टर प्रतिस्पर्धी ब्लादिमीर क्रॅमनिक आनंदला इतक्या सहजा सहजी बाजी मारू देईल का? व्लादिमीर क्रॅमनिकसाठी ही दहावी मॅच अगदी अटी तटीची होती आणि त्यानं सर्वस्व पणाला लावत ती जिंकलीही. सोमवारी रात्री क्रॅमनिकनं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या दहाव्या राउंडमध्ये आनंदचा पराभव केला आणि आनंदचा दिवाळीचा जल्लोष कमी केला. आनंदचा वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील हा पहिलाचं पराभव. या पराभवानंतर बोलताना आनंद म्हणाला, ' आत्ता सांगण कठीण आहे की नक्की माझं काय चुकलं. पण निश्चितचं मी कुठेतरी कमा पडलो. 'पांढर्‍या सोंगट्यांनी खेळणार्‍या क्रॅमनिकनं अवघ्या 29 चालींतच आनंदचा आश्चर्यकारक पराभव केला. पण आनंदला आता सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनायला फक्त अर्ध्या पॉइंटची गरज आहे. उरलेल्या दोन गेम्सपैकी आनंदनं फक्त एक जरी गेम ड्रॉ केला तर आनंद वर्ल्ड चॅम्पियन बनेल. अर्थात याची क्रॅमनिकलाही कल्पना आहे. ' आत्ताच मला भविष्याचा विचार करायचा नाही. मी जिंकण्याचे चान्सेस पन्नास टक्क्यांहूनही कमी आहेत ' असं तो म्हणाला.आनंदनं लवकरात लवकर वर्ल्ड चॅम्पियन व्हावं यासाठी भारतात चेस फॅन्स प्रार्थना करत आहेत. पण आनंदच्या या विजयासाठी आता त्यांना बुधवार रात्रीपर्यंत वाट पहावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2008 08:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2008 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close