S M L

कॅगकडून कॉमनवेल्थची चौकशी

18 ऑक्टोबरकॉमनवेल्थच्या घोटाळ्यांची चौकशी करून त्याबद्दल जबाबदारी नक्की करण्याचे काम आता सुरू झाले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या खर्चाचे ऑडिट येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती कॅगचे अधिकारी विनोद रॉय यांनी दिली आहे. कॉमनवेल्थसंदर्भात नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाची आज बैठक झाली. त्यात आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित उपस्थित होत्या. या दोघांनाही काँग्रेसने फटकारले आहे. वेगवेगळ्या संस्था कॉमनवेल्थमधल्या सगळ्या व्यवहारांची कसून चौकशी करणार आहेत. त्यासाठी पुढचे तीन महिने अधिकार्‍यांच्या सुट्‌ट्याही रद्द करण्यात आल्या आहे. चौकशीला मदत व्हावी यासाठी आयोजन समितीची मुदत वाढवण्याचा निर्णय मंत्रिगटाने घेतला आहे. करदात्यांचा पैसा कुणी किती खर्च केला, याचा तपास केंद्रीय दक्षता आयोग आणि कॅग करणार आहे. कॅगने येत्या तीन महिन्यांत कॉमनवेल्थच्या खर्चाचे ऑडिट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.कॅग वेगवेगळ्या 24 विभागांची चौकशी करणार आहे. त्यातले तब्बल 15 विभाग दिल्ली सरकारच्या अधिकाराखाली येतात. दक्षता आयोगाचा अहवाल व्ही. के. शुंगलू यांच्या समितीकडे सादर करण्यात येईल. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटही स्पर्धांसाठी झालेल्या साहित्य खरेदीची चौकशी करणार आहे. या संस्थाची होणार पडताळणी -कॉमनवेल्थ आयोजन समिती -सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट -दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी -सार्वजनिक बांधकाम विभाग -दिल्ली महापालिका-नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिल

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 05:32 PM IST

कॅगकडून कॉमनवेल्थची चौकशी

18 ऑक्टोबर

कॉमनवेल्थच्या घोटाळ्यांची चौकशी करून त्याबद्दल जबाबदारी नक्की करण्याचे काम आता सुरू झाले आहे.

कॉमनवेल्थ गेम्सच्या खर्चाचे ऑडिट येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती कॅगचे अधिकारी विनोद रॉय यांनी दिली आहे.

कॉमनवेल्थसंदर्भात नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाची आज बैठक झाली. त्यात आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित उपस्थित होत्या.

या दोघांनाही काँग्रेसने फटकारले आहे. वेगवेगळ्या संस्था कॉमनवेल्थमधल्या सगळ्या व्यवहारांची कसून चौकशी करणार आहेत.

त्यासाठी पुढचे तीन महिने अधिकार्‍यांच्या सुट्‌ट्याही रद्द करण्यात आल्या आहे.

चौकशीला मदत व्हावी यासाठी आयोजन समितीची मुदत वाढवण्याचा निर्णय मंत्रिगटाने घेतला आहे.

करदात्यांचा पैसा कुणी किती खर्च केला, याचा तपास केंद्रीय दक्षता आयोग आणि कॅग करणार आहे.

कॅगने येत्या तीन महिन्यांत कॉमनवेल्थच्या खर्चाचे ऑडिट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

कॅग वेगवेगळ्या 24 विभागांची चौकशी करणार आहे. त्यातले तब्बल 15 विभाग दिल्ली सरकारच्या अधिकाराखाली येतात.

दक्षता आयोगाचा अहवाल व्ही. के. शुंगलू यांच्या समितीकडे सादर करण्यात येईल.

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटही स्पर्धांसाठी झालेल्या साहित्य खरेदीची चौकशी करणार आहे.

या संस्थाची होणार पडताळणी

-कॉमनवेल्थ आयोजन समिती

-सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट

-दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी

-सार्वजनिक बांधकाम विभाग

-दिल्ली महापालिका

-नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close