S M L

पर्यावरण समितीकडून विमानतळ जागेची पाहणी

21 ऑक्टोबरनवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण तज्ज्ञ समिती सध्या आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यालयात या समितीने सिडकोचे अधिकारी, नगरविकास सचिव टी. सी. बेंजामिन, पर्यावरण सचिव वलसा नायर यांच्यासह एक बैठक घेतली. या बैठकीत पर्यावरणविषयक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. विमानतळाला परवानगी देण्यासंदर्भात समितीचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याचा दावा यावेळी सिडकोने केला आहे. नवी मुंबई विमानतळाबाबत सिडकोने आपला अहवाल तज्ज्ञ समितीला सादर केला आहे. केंद्राच्या पर्यावरण खात्याच्या तज्ज्ञांच्या टीमने आज नियोजित जागेला भेट देऊन पाहणी केली. फक्त गाढी नदीचा नैसर्गिक प्रवाह वाचवण्यात येईल, असे सिडकोने आपल्या अहवालात म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 02:40 PM IST

पर्यावरण समितीकडून विमानतळ जागेची पाहणी

21 ऑक्टोबर

नवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण तज्ज्ञ समिती सध्या आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यालयात या समितीने सिडकोचे अधिकारी, नगरविकास सचिव टी. सी. बेंजामिन, पर्यावरण सचिव वलसा नायर यांच्यासह एक बैठक घेतली. या बैठकीत पर्यावरणविषयक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

विमानतळाला परवानगी देण्यासंदर्भात समितीचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याचा दावा यावेळी सिडकोने केला आहे. नवी मुंबई विमानतळाबाबत सिडकोने आपला अहवाल तज्ज्ञ समितीला सादर केला आहे.

केंद्राच्या पर्यावरण खात्याच्या तज्ज्ञांच्या टीमने आज नियोजित जागेला भेट देऊन पाहणी केली.

फक्त गाढी नदीचा नैसर्गिक प्रवाह वाचवण्यात येईल, असे सिडकोने आपल्या अहवालात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close