S M L

कॉमनवेल्थ घोटाळयात कचर्‍याची बॅग 4 रुपया ऐवजी तब्बल 3 हजारांना

22 ऑक्टोबरकॉमनवेल्थ घोटाळ्यासंदर्भात चौकशीदरम्यान आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. विशेषत: नोईडा एक्सप्रेस-वे संदर्भात तर उघड उघड नासाडी झालेली दिसून येत असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने स्पष्ट केलं आहे. या हायवेवर संरक्षण कठडे उभारण्यासाठी मोठा निधी खर्च झाला. प्रत्यक्षात मात्र हे सगळे रस्ते सुरक्षेच्याच करणासाठी सील करण्यात आले होते. त्यामुळे हा खर्च वायाच गेला. प्रत्येकी 32 हजार खर्चाचे वॉटर डिस्पेन्सरही पडूनच होते. अनेक वस्तूंच्या खरेदी दरातही प्रचंड तफावत असल्याचंही सीव्हीसीच्या पाहणीत समोर आले आहे. 8 लाखांच्या ट्रेडमिल्स आणि आणि प्रत्येकी तब्बल 1 लाख रुपयाचा दरवाजा म्हणजे तर या अनियमिततेचा कळसच म्हणावा लागेल. त्या सगळ्यावर वरताण म्हणजे एका कंपनीकडून जी कचर्‍याची बॅग केवळ 4 रुपयांना घेण्यात आली होती, तीच बॅग दुसर्‍या कंपनीकडून तब्बल 3 हजारांनाखरेदी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 10:38 AM IST

कॉमनवेल्थ घोटाळयात कचर्‍याची बॅग 4 रुपया ऐवजी तब्बल 3 हजारांना

22 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ घोटाळ्यासंदर्भात चौकशीदरम्यान आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे.

विशेषत: नोईडा एक्सप्रेस-वे संदर्भात तर उघड उघड नासाडी झालेली दिसून येत असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने स्पष्ट केलं आहे.

या हायवेवर संरक्षण कठडे उभारण्यासाठी मोठा निधी खर्च झाला. प्रत्यक्षात मात्र हे सगळे रस्ते सुरक्षेच्याच करणासाठी सील करण्यात आले होते.

त्यामुळे हा खर्च वायाच गेला. प्रत्येकी 32 हजार खर्चाचे वॉटर डिस्पेन्सरही पडूनच होते.

अनेक वस्तूंच्या खरेदी दरातही प्रचंड तफावत असल्याचंही सीव्हीसीच्या पाहणीत समोर आले आहे.

8 लाखांच्या ट्रेडमिल्स आणि आणि प्रत्येकी तब्बल 1 लाख रुपयाचा दरवाजा म्हणजे तर या अनियमिततेचा कळसच म्हणावा लागेल.

त्या सगळ्यावर वरताण म्हणजे एका कंपनीकडून जी कचर्‍याची बॅग केवळ 4 रुपयांना घेण्यात आली होती, तीच बॅग दुसर्‍या कंपनीकडून तब्बल 3 हजारांनाखरेदी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close