S M L

नक्षलग्रस्त भागाचा कृती आराखडा

22 ऑक्टोबरनक्षलवादविरोधी व्यूहरचनेत महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी गृहमंत्री आर. आर. पाटलांना सर्व खात्यांच्या जिल्हानिहाय कामांमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. तसेच नक्षलग्रस्त भागात पूर्ण वेळ एक 'MI- 17' बनावटीचे अद्ययावत 20 आसनी हेलिकॉप्टर तैनात ठेवले जाणार आहे. या हेलिकॉप्टरचा वापर बचाव कार्य आणि रसद पुरवण्यासाठी केला जाणार आहे. सध्याच्या सी-60 या नक्षलविरोधी पथकाच्या बरोबरीने आणखी एक कॉम्बट कमांडोंची टीम बनवली जाणार आहे. नक्षलग्रस्त भागाचा कृती आराखडा पुढच्या आठवड्यात मंजूर केला जाणार आहे. आयबीएन-लोकमतला मिळालेलेल्या माहितीनुसार कृती आराखड्यामध्ये काही धोरणात्मक आणि प्रशासकीय बदलांचा समावेश असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 12:34 PM IST

नक्षलग्रस्त भागाचा कृती आराखडा

22 ऑक्टोबर

नक्षलवादविरोधी व्यूहरचनेत महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी गृहमंत्री आर. आर. पाटलांना सर्व खात्यांच्या जिल्हानिहाय कामांमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत.

तसेच नक्षलग्रस्त भागात पूर्ण वेळ एक 'MI- 17' बनावटीचे अद्ययावत 20 आसनी हेलिकॉप्टर तैनात ठेवले जाणार आहे.

या हेलिकॉप्टरचा वापर बचाव कार्य आणि रसद पुरवण्यासाठी केला जाणार आहे.

सध्याच्या सी-60 या नक्षलविरोधी पथकाच्या बरोबरीने आणखी एक कॉम्बट कमांडोंची टीम बनवली जाणार आहे.

नक्षलग्रस्त भागाचा कृती आराखडा पुढच्या आठवड्यात मंजूर केला जाणार आहे.

आयबीएन-लोकमतला मिळालेलेल्या माहितीनुसार कृती आराखड्यामध्ये काही धोरणात्मक आणि प्रशासकीय बदलांचा समावेश असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close