S M L

रत्नागिरीत बेसुमार चोरटी जंगलतोड

22 ऑक्टोबररत्नागिरी जिल्ह्यात बेसुमार चोरटी जंगलतोड सुरू असून लांजा तालुक्यात कांटे, पन्हळे, पालू भागातली जंगले सध्या उजाड झाली आहेत. साग, आंबा, फणसासारखेही वृक्ष तोडले जात आहे. हे सर्व लाकूड इचलकरंजी आणि कोल्हापूर भागातल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीजसाठी नेण्यात येतं आहे. सध्या एकट्या लांजा तालुक्यातून महिन्याला जवळपास 200 ट्रक लाकूड पश्चिम महाराष्ट्रात व्यापारासाठी नेले जात आहे. पश्चिम घाट परिसरात येत असलेल्या या भागातल्या अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्य प्राण्यांचा जीवही धोक्यात आला आहे. या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते अशी पर्यावरण प्रेमींची खंत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 12:50 PM IST

रत्नागिरीत बेसुमार चोरटी जंगलतोड

22 ऑक्टोबर

रत्नागिरी जिल्ह्यात बेसुमार चोरटी जंगलतोड सुरू असून लांजा तालुक्यात कांटे, पन्हळे, पालू भागातली जंगले सध्या उजाड झाली आहेत.

साग, आंबा, फणसासारखेही वृक्ष तोडले जात आहे. हे सर्व लाकूड इचलकरंजी आणि कोल्हापूर भागातल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीजसाठी नेण्यात येतं आहे.

सध्या एकट्या लांजा तालुक्यातून महिन्याला जवळपास 200 ट्रक लाकूड पश्चिम महाराष्ट्रात व्यापारासाठी नेले जात आहे.

पश्चिम घाट परिसरात येत असलेल्या या भागातल्या अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्य प्राण्यांचा जीवही धोक्यात आला आहे.

या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते अशी पर्यावरण प्रेमींची खंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close