S M L

माथाडी कामगारांचा सोमवारपासून राज्यभर बंद

24 ऑक्टोबरअनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या मागण्यांवर माथाडी कामगारांनी सोमवारपासून राज्यभर बंद पुकारला आहे. पण या बंदचा फटका मुंबईला बसणार आहे. सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन माथाडी कामगारांनी पुकारला आहे. मात्र आजपासूनच मुंबईतला भाजीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संपाच्या काळात शेतकर्‍यांकडून भाजी न घेण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे. यामुळे मुंबई , ठाणे, नवी मुंबई या परिसराला या बंदचा फटका बसणार आहे. बंदच्या काळात नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारपेठेत एकही गाडी भाजीपाला येणार नसल्याचे माथाडी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या बंदला पाठिंबा देणार्‍या ए पी एम सी व्यापार्‍यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 12:58 PM IST

माथाडी कामगारांचा सोमवारपासून राज्यभर बंद

24 ऑक्टोबर

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या मागण्यांवर माथाडी कामगारांनी सोमवारपासून राज्यभर बंद पुकारला आहे.

पण या बंदचा फटका मुंबईला बसणार आहे. सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन माथाडी कामगारांनी पुकारला आहे.

मात्र आजपासूनच मुंबईतला भाजीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संपाच्या काळात शेतकर्‍यांकडून भाजी न घेण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे.

यामुळे मुंबई , ठाणे, नवी मुंबई या परिसराला या बंदचा फटका बसणार आहे.

बंदच्या काळात नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारपेठेत एकही गाडी भाजीपाला येणार नसल्याचे माथाडी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

या बंदला पाठिंबा देणार्‍या ए पी एम सी व्यापार्‍यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close