S M L

काँग्रेसची एकला चलो रे ची भूमिका

24 ऑक्टोबरकोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्यने एकत्रितरित्या ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राज्यस्तरावर एकत्र नांदणारे आघाडीचे हे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत मात्र एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मतदारांना लुटणार्‍या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थारा देवू नका, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कॉग्रेस पक्षाचे नाव न घेता केली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ढोबळे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता त्यांनी ही टीका केली. कोल्हापूर शहराचा विकास हवा असेल तर राष्ट्रवादी -जनसुराज्य आघाडीला विजयी करा असं आवाहनही ढोबळे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर शहरासाठी थेट पाईपलाईनची योजना राबवू असे आश्वासन त्यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 03:54 PM IST

काँग्रेसची एकला चलो रे ची भूमिका

24 ऑक्टोबर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.

तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्यने एकत्रितरित्या ही निवडणूक लढवत आहे.

त्यामुळे राज्यस्तरावर एकत्र नांदणारे आघाडीचे हे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत मात्र एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत.

पैशाचे आमिष दाखवून मतदारांना लुटणार्‍या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थारा देवू नका, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कॉग्रेस पक्षाचे नाव न घेता केली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ढोबळे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता त्यांनी ही टीका केली.

कोल्हापूर शहराचा विकास हवा असेल तर राष्ट्रवादी -जनसुराज्य आघाडीला विजयी करा असं आवाहनही ढोबळे यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर शहरासाठी थेट पाईपलाईनची योजना राबवू असे आश्वासन त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close