S M L

बिहारमध्ये 52 टक्के मतदान

24 ऑक्टोबरबिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातल्या 45 जागांसाठी मतदान पार पडले. दिवसअखेर 52 टक्के मतदानाची नोंद झाली.पूर्व चंपारणमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 58 टक्के मतदान झाले. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. यात सीतामढी जिल्ह्यातल्या रुन्नी सैदपूर भागामध्ये तीन पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती आहे.या भागातल्या एस.पींनी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण झाल्याची शक्यता नाकारली. 45 पैकी 6 जिल्ह्यात म्हणजे शिवहर, समस्तीपूर, दरभंगा, सीतामढी मुजफ्फरपूर, आणि पूर्व चंपारणच्या काही भागांमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 ठेवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 05:27 PM IST

बिहारमध्ये 52 टक्के मतदान

24 ऑक्टोबर

बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातल्या 45 जागांसाठी मतदान पार पडले. दिवसअखेर 52 टक्के मतदानाची नोंद झाली.

पूर्व चंपारणमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 58 टक्के मतदान झाले. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.

यात सीतामढी जिल्ह्यातल्या रुन्नी सैदपूर भागामध्ये तीन पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

या भागातल्या एस.पींनी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण झाल्याची शक्यता नाकारली.

45 पैकी 6 जिल्ह्यात म्हणजे शिवहर, समस्तीपूर, दरभंगा, सीतामढी मुजफ्फरपूर, आणि पूर्व चंपारणच्या काही भागांमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 ठेवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close