S M L

औरंगाबादमध्ये भेसळयुक्त खवा

25 ऑक्टोबरऔरंगाबादमध्ये भेसळयुक्त दुधापाठोपाठ आता भेसळयुक्त खवाही पकडण्यात आला आहे. तब्बल 1240 किलो भेसळयुक्त खवा पोलिसांनी पकडला. नगरपाठोपाठ औरंगाबाद शहरात भेसळयुक्त दूध पकडण्यात आले होते. आणि आता गुजरातमधून आलेला 1240 किलो भेसळयुक्त खवा पकडण्यात आला. जळगावातही कारवाईजळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये नुकताच भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे दिवाळीच्या मिठाईच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादहून आलेल्या श्रीराम ट्रॅव्हल्समधून खव्याच्या या 30 गोणी भुसावळला आल्या होत्या. या खव्य्यात भेसळ असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली होती. पालिकेच्या फूड ऍण्ड ड्रग विभागाच्या पथकाने तातडीने हा खवा ताब्यात घेतला. भुसावळ शहरातील गुजराती स्वीट्सच्या एका कर्मचार्‍याने या 5 थैल्यांची मागणी केल्याचे कबूल केले आहे. औरंगाबाद शहरातील हॉटेल्समध्ये हा खवा पुरवण्यात येणार होता. त्यामुळे हॉटेल्समधील मिठाईही आरोग्यासाठी जीवघेणी ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:45 AM IST

औरंगाबादमध्ये भेसळयुक्त खवा

25 ऑक्टोबर

औरंगाबादमध्ये भेसळयुक्त दुधापाठोपाठ आता भेसळयुक्त खवाही पकडण्यात आला आहे.

तब्बल 1240 किलो भेसळयुक्त खवा पोलिसांनी पकडला. नगरपाठोपाठ औरंगाबाद शहरात भेसळयुक्त दूध पकडण्यात आले होते.

आणि आता गुजरातमधून आलेला 1240 किलो भेसळयुक्त खवा पकडण्यात आला.

जळगावातही कारवाई

जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये नुकताच भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे दिवाळीच्या मिठाईच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुजरात राज्यातील अहमदाबादहून आलेल्या श्रीराम ट्रॅव्हल्समधून खव्याच्या या 30 गोणी भुसावळला आल्या होत्या. या खव्य्यात भेसळ असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली होती.

पालिकेच्या फूड ऍण्ड ड्रग विभागाच्या पथकाने तातडीने हा खवा ताब्यात घेतला. भुसावळ शहरातील गुजराती स्वीट्सच्या एका कर्मचार्‍याने या 5 थैल्यांची मागणी केल्याचे कबूल केले आहे.

औरंगाबाद शहरातील हॉटेल्समध्ये हा खवा पुरवण्यात येणार होता. त्यामुळे हॉटेल्समधील मिठाईही आरोग्यासाठी जीवघेणी ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close