S M L

भारतीय टीमची निवड

25 ऑक्टोबरन्यूझिलंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी भारतीय टीमची निवड आज करण्यात आली. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि गौतम गंभीर दुखापतीतून सावरलेत. त्यामुळे त्यांनी टीममध्ये कमबॅक केले आहे. पण युवराज सिंगला मात्र पुन्हा एकदा टेस्ट टीममध्ये स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळलेल्या टीममध्ये फारसे बदल झालेले नाहीत. सौराष्ट्रचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने अपेक्षेप्रमाणेच टीममधली जागा कायम राखली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ईशांत शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानेही टीममध्ये पुन्हा जागा मिळवली आहे. त्याच्या बरोबर झहीर खान आणि एस श्रीसंत फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील. तर हरभजन, अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांच्यावर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल. न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट 4 नोव्हेंबरपासून अहमदाबाद इथे रंगणार आहे एक नजर टाकूया भारतीय टीमवर...महेंद्र सिंग धोणी (कॅ)वीरेंद्र सेहवागगौतम गंभीरमुरली विजयराहुल द्रविडसचिन तेंडुलकरव्ही व्ही एस लक्ष्मणसुरेश रैनाचेतेश्वर पुजाराहरभजन सिंगझहीर खानईशांत शर्माएस श्रीसंतप्रग्यान ओझाअमित मिश्रा

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:51 AM IST

भारतीय टीमची निवड

25 ऑक्टोबर

न्यूझिलंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी भारतीय टीमची निवड आज करण्यात आली. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि गौतम गंभीर दुखापतीतून सावरलेत.

त्यामुळे त्यांनी टीममध्ये कमबॅक केले आहे. पण युवराज सिंगला मात्र पुन्हा एकदा टेस्ट टीममध्ये स्थान मिळालेले नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळलेल्या टीममध्ये फारसे बदल झालेले नाहीत.

सौराष्ट्रचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने अपेक्षेप्रमाणेच टीममधली जागा कायम राखली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ईशांत शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानेही टीममध्ये पुन्हा जागा मिळवली आहे.

त्याच्या बरोबर झहीर खान आणि एस श्रीसंत फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळतील.

तर हरभजन, अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांच्यावर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल.

न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट 4 नोव्हेंबरपासून अहमदाबाद इथे रंगणार आहे

एक नजर टाकूया भारतीय टीमवर...

महेंद्र सिंग धोणी (कॅ)

वीरेंद्र सेहवाग

गौतम गंभीर

मुरली विजय

राहुल द्रविड

सचिन तेंडुलकर

व्ही व्ही एस लक्ष्मण

सुरेश रैना

चेतेश्वर पुजारा

हरभजन सिंग

झहीर खान

ईशांत शर्मा

एस श्रीसंत

प्रग्यान ओझा

अमित मिश्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close