S M L

सिंचन प्रकल्पाचा 300 कोटींचा निधी रोखला

27 ऑक्टोबरअर्थखात्याच्या शिफारशीमुळे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी देण्यात येणारा तीनशे कोटींचा निधी राज्यपालांनी रोखल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे. हा निधी रोखू नये म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष र. पु. कुरूलकर यांनी राज्यपालांना पत्रही लिहंले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष र. पु. कुरूलगकर यांनी राज्यपालांना पाठिवेल्या या पत्रात तातडीच्या दोन मुद्याकंडे लक्ष वेधले आहे. पहिला मुद्दा आहे तो जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा आणि दुसरा आहे तो मराठवाड्याचे सिंचनाचे तीनशे कोटींचा निधी राज्यपालांनी रोखल्याचा. हा निधी तातडीनं वितरीत करावा अशी मागणीच मंडळान राज्यपालाकड केली आहे.अर्थखात्याच्या शिफारशीमुळे यावर्षी मराठवाड्यातील सिंचनाच्या कामांसाठीचा तीनशे कोटींचा निधी थांबविण्यात आल्यामुळे आधीच्याच अनुशेषामध्ये भर पडणार आहे. सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडूनही पीक परिस्थिती आणि पाणी परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे किमान मंजूर झालेली मराठवाड्याच्या वाट्टयाची रक्कम तरी रोखू नये, अशी मंडळाची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 11:57 AM IST

27 ऑक्टोबर

अर्थखात्याच्या शिफारशीमुळे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी देण्यात येणारा तीनशे कोटींचा निधी राज्यपालांनी रोखल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

हा निधी रोखू नये म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष र. पु. कुरूलकर यांनी राज्यपालांना पत्रही लिहंले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष र. पु. कुरूलगकर यांनी राज्यपालांना पाठिवेल्या या पत्रात तातडीच्या दोन मुद्याकंडे लक्ष वेधले आहे.

पहिला मुद्दा आहे तो जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा आणि दुसरा आहे तो मराठवाड्याचे सिंचनाचे तीनशे कोटींचा निधी राज्यपालांनी रोखल्याचा.

हा निधी तातडीनं वितरीत करावा अशी मागणीच मंडळान राज्यपालाकड केली आहे.

अर्थखात्याच्या शिफारशीमुळे यावर्षी मराठवाड्यातील सिंचनाच्या कामांसाठीचा तीनशे कोटींचा निधी थांबविण्यात आल्यामुळे आधीच्याच अनुशेषामध्ये भर पडणार आहे.

सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडूनही पीक परिस्थिती आणि पाणी परिस्थिती चिंताजनक आहे.

त्यामुळे किमान मंजूर झालेली मराठवाड्याच्या वाट्टयाची रक्कम तरी रोखू नये, अशी मंडळाची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close