S M L

लकी द ग्रेट खली

27 ऑक्टोबरबिग बॉसच्या घरात खलीची एंट्री होऊन आठवडा झाला आहे. पण तरीही या नव्या सदस्याची नवलाई अजून संपलेली दिसत नाही. डब्लू डब्लू ई च्या या सुपरस्टारच्या दिमतीसाठी बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या नियमातही बदल करण्यात आले. बिग बॉसच्या घरात कोण तरी जिंकते तर कुणी हरते. पण बिग बॉसचा 4चा सदस्य डब्लू डब्लू ई सुपरस्टार द ग्रेट खलीची मात्र या घरातली तर्‍हा न्यारीच आहे, या घरात मोठ्या दणक्यात प्रवेश केल्यापासूनच बिग बॉस खलीला स्पेशल ट्रिटमेंट देत आहे. इतके च नाही तर खलीसाठी दिवसातने तीन वेळा रेडिमेड खाद्य बिग बॉसच्या घरात येते. आत्तापर्यंत अशा प्रकारे रेडिमेड खाद्य कुणालाच दिले गेलेले नाही तिथे सदस्यांना स्वतः बनवूनच खावे लागते. पण खलीचे आदरातिथ्य इथपर्यंतच थांबत नाही तर खलीच्या या खाण्यासाठी बिग बॉसमध्ये जालंधरवरुन एका खास शेफला बोलवले गेले आहे. त्यामुळे घरातले बाकीचे सदस्य मोजक्या खाण्यामध्ये दिवस काढत असताना खली मात्र हे खाद्य ,मस्त दुध आणि तब्बल दोनशे दहा अंड्यावर ताव मारतोय. एकूणच बिग बॉस खलीवर जास्तच मेहेरबान आहे किंवा त्याला खलीच्या रोजच्या डाएटची विशेष चिंता आहे, हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे. कारण खली हे सगळे चांगलेच एन्जॉय करत असला तरी कितपत कारण कधी तरी घरच्या सदस्यांच्या या सहनशीलतेचा कडेलोट होईल हे पहाण्यासारखे असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 12:08 PM IST

लकी द ग्रेट खली

27 ऑक्टोबर

बिग बॉसच्या घरात खलीची एंट्री होऊन आठवडा झाला आहे. पण तरीही या नव्या सदस्याची नवलाई अजून संपलेली दिसत नाही.

डब्लू डब्लू ई च्या या सुपरस्टारच्या दिमतीसाठी बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या नियमातही बदल करण्यात आले.

बिग बॉसच्या घरात कोण तरी जिंकते तर कुणी हरते.

पण बिग बॉसचा 4चा सदस्य डब्लू डब्लू ई सुपरस्टार द ग्रेट खलीची मात्र या घरातली तर्‍हा न्यारीच आहे, या घरात मोठ्या दणक्यात प्रवेश केल्यापासूनच बिग बॉस खलीला स्पेशल ट्रिटमेंट देत आहे.

इतके च नाही तर खलीसाठी दिवसातने तीन वेळा रेडिमेड खाद्य बिग बॉसच्या घरात येते.

आत्तापर्यंत अशा प्रकारे रेडिमेड खाद्य कुणालाच दिले गेलेले नाही तिथे सदस्यांना स्वतः बनवूनच खावे लागते.

पण खलीचे आदरातिथ्य इथपर्यंतच थांबत नाही तर खलीच्या या खाण्यासाठी बिग बॉसमध्ये जालंधरवरुन एका खास शेफला बोलवले गेले आहे.

त्यामुळे घरातले बाकीचे सदस्य मोजक्या खाण्यामध्ये दिवस काढत असताना खली मात्र हे खाद्य ,मस्त दुध आणि तब्बल दोनशे दहा अंड्यावर ताव मारतोय.

एकूणच बिग बॉस खलीवर जास्तच मेहेरबान आहे किंवा त्याला खलीच्या रोजच्या डाएटची विशेष चिंता आहे, हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे.

कारण खली हे सगळे चांगलेच एन्जॉय करत असला तरी कितपत कारण कधी तरी घरच्या सदस्यांच्या या सहनशीलतेचा कडेलोट होईल हे पहाण्यासारखे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close