S M L

मुख्यमंत्री चव्हाण अडचणीत...

29 ऑक्टोबरदक्षिण मुंबईत नव्याने उभी राहिलेली 31 मजली इमारत वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. आणि यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण अडचणीत सापडले आहेत. सरकारी बाबू आणि राजकारण्यांनी नियमांचा भंग करून मोक्याची जागा आणि इमारतीतले फ्लॅट्स लाटल्याचे उघडकीस आले आहे. वादग्रस्त आदर्श सोसायटीतले फ्लॅट मिळवणार्‍यांमध्ये अनेक मोठी नावे आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:साठी किंवा आपल्या नातेवाईंकांसाठी फ्लॅट्स लाटण्यात आले. आता तर इमारतीतले गाळे विकून फ्लॅट फुकटात पदरात पाडून घेण्याचा डाव प्रमोटर्सनी चालवलाय. या इमारतीला जेव्हा 2001 मध्ये परवानगी मिळाली, तेव्हा त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली नाही, अशी धक्कादायक माहिती उघड झालीय्. राज्य सरकारने ही जागा लष्कराच्या ताब्यात दिली होती. पण राजकारण्यांचाच डोळा तिच्यावर पडल्यामुळे सर्व नियमांचे उल्लंघन करून इमारतीला परवानगी देण्यात आली. तत्कालिन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांच्या सासू दिवगंत भगवती शर्मा यांना सदनिका मिळाली. महत्वाच्या परवानग्या देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना सदनिका मिळाली, महसूल विभागातल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना सदनिका मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना सदनिका मिळाल्या, या जागेचा नौदलाशी संबंध म्हणून मोठ्या नौदल अधिकार्‍यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सदनिका मिळाल्या. एवढे सर्व गोलमाल होऊनही या इमारतीचे प्रमोटर मात्र काही चुकीचे झालेच नाही, असा दावा करत आहेत.एवढेच नाही, आता इमारतीतील गाळे विकून त्या पैशात आपल्या सदनिका मोफत करून घेण्याचा प्रयत्न प्रमोटर्सनी चालवला आहे. सरकारी यंत्रणाच दावणीला बांधली गेल्याने हम करे सो कायदा या थाटात सर्व गैरव्यवहार झालाय, हे उघड उघड दिसत आहे. मुख्यमंत्र्यांविषयीचे पुरावेमुख्यमंत्र्यांचं नाव आदर्श सोसायटी प्रकरणात कसे गुंतलेले आहेत, याचे लेखी पुरावेसुध्दा आता आयबीएन नेटवर्ककडे आहेत. आता उपलब्ध पुराव्यांनुसार मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या नावे 4 फ्लॅट असल्याच समजते. अशोक चव्हाण जेव्हा महसूलमंत्री होते, तेव्हा आदर्श सोसायटीच्या मॅनेजमेंटने एक पत्र लिहिलेले होते. संरक्षण खात्यात नसलेल्यांना या सोसायटीतले 40 टक्के फ्लॅट्स देण्यात येतील, अशी परवानगी त्यात देण्यात आली होती. आदर्श अपार्टमेंटमधले फ्लॅट ज्या 104 जणांना देण्यात आले होते, त्यापैकी चार जण हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला एक पत्र लिहिले. त्यात ओपन कॅटेगरीतल्या लोकांना काही फ्लॅटस देण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2010 10:58 AM IST

मुख्यमंत्री चव्हाण अडचणीत...

29 ऑक्टोबर

दक्षिण मुंबईत नव्याने उभी राहिलेली 31 मजली इमारत वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

आणि यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण अडचणीत सापडले आहेत. सरकारी बाबू आणि राजकारण्यांनी नियमांचा भंग करून मोक्याची जागा आणि इमारतीतले फ्लॅट्स लाटल्याचे उघडकीस आले आहे.

वादग्रस्त आदर्श सोसायटीतले फ्लॅट मिळवणार्‍यांमध्ये अनेक मोठी नावे आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:साठी किंवा आपल्या नातेवाईंकांसाठी फ्लॅट्स लाटण्यात आले.

आता तर इमारतीतले गाळे विकून फ्लॅट फुकटात पदरात पाडून घेण्याचा डाव प्रमोटर्सनी चालवलाय. या इमारतीला जेव्हा 2001 मध्ये परवानगी मिळाली, तेव्हा त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली नाही, अशी धक्कादायक माहिती उघड झालीय्.

राज्य सरकारने ही जागा लष्कराच्या ताब्यात दिली होती. पण राजकारण्यांचाच डोळा तिच्यावर पडल्यामुळे सर्व नियमांचे उल्लंघन करून इमारतीला परवानगी देण्यात आली.

तत्कालिन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांच्या सासू दिवगंत भगवती शर्मा यांना सदनिका मिळाली.

महत्वाच्या परवानग्या देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना सदनिका मिळाली, महसूल विभागातल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना सदनिका मिळाली.

त्यांच्या नातेवाईकांना सदनिका मिळाल्या, या जागेचा नौदलाशी संबंध म्हणून मोठ्या नौदल अधिकार्‍यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सदनिका मिळाल्या.

एवढे सर्व गोलमाल होऊनही या इमारतीचे प्रमोटर मात्र काही चुकीचे झालेच नाही, असा दावा करत आहेत.

एवढेच नाही, आता इमारतीतील गाळे विकून त्या पैशात आपल्या सदनिका मोफत करून घेण्याचा प्रयत्न प्रमोटर्सनी चालवला आहे.

सरकारी यंत्रणाच दावणीला बांधली गेल्याने हम करे सो कायदा या थाटात सर्व गैरव्यवहार झालाय, हे उघड उघड दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांविषयीचे पुरावे

मुख्यमंत्र्यांचं नाव आदर्श सोसायटी प्रकरणात कसे गुंतलेले आहेत, याचे लेखी पुरावेसुध्दा आता आयबीएन नेटवर्ककडे आहेत.

आता उपलब्ध पुराव्यांनुसार मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या नावे 4 फ्लॅट असल्याच समजते. अशोक चव्हाण जेव्हा महसूलमंत्री होते, तेव्हा आदर्श सोसायटीच्या मॅनेजमेंटने एक पत्र लिहिलेले होते.

संरक्षण खात्यात नसलेल्यांना या सोसायटीतले 40 टक्के फ्लॅट्स देण्यात येतील, अशी परवानगी त्यात देण्यात आली होती.

आदर्श अपार्टमेंटमधले फ्लॅट ज्या 104 जणांना देण्यात आले होते, त्यापैकी चार जण हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत.

त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला एक पत्र लिहिले.

त्यात ओपन कॅटेगरीतल्या लोकांना काही फ्लॅटस देण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2010 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close