S M L

लातूर वीज वितरण कर्मचा-यांचा स्वेच्छानिवृत्तीस विरोध

दिनांक 29 ऑक्टोबर, लातूर- वाढत्या वयामुळे शारीरिदृष्ट्या अक्षम ठरलेल्या वीज कर्मचा-यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीच्या लातूर विभागानं घेतला आहे. ही स्वेच्छा निवृत्ती घेताना वीज कंपनी कर्मचा-यांना अनेक सवलती देणार आहे. कंपनीची ही स्वेच्छानिवृत्ती योजना 200 कर्मचा-यांनी स्वीकारली आहे. परंतु दोन हजार कर्मचा-यांचा त्याला विरोधही केला आहे. वीज वितरण कंपनीत गेली अनेक वर्ष सेवेत असलेल्या कर्मचा-यांना वाढत्या वयाबरोबर वीजेच्या पोलवर चढण्यासारखी कष्टाची कामं झेपत नाहीत. हे ध्यानात घेऊनच वीज वितरण कंपनीनं अशा कर्मचा-यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड या चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागात 5 ते 6 हजार लाइमन काम करत आहेत. यापैकी शारीरिकदृष्ट्या अक्षम ठरलेल्या 200 कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2008 03:16 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2008 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close