S M L

खव्याच्या भेसळखोरांचा धिंगाणा

28 ऑक्टोबरऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादमध्ये आणखी 1640 किलो भेसळयुक्त खवा क्राईम ब्रांचने जप्त केला आहे. खवा विक्री करणार्‍या गोपालसिंग पाल आणि राजुसिंग पाल या दोघांना सिडको परिसरातून दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. दोघंही गुजरातचे असून शहरातल्या 50 व्यापार्‍यांना बनावट खवा विकल्याची कबुली दिली आहे. क्राईम ब्रांचने कारवाई करत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील होराईझन्स कोल्ड स्टोरेज गोदामावर छापा मारुन 1640 किलो खवा जप्त केला आहे. सणासुदीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा विक्रीसाठी येत आहे. याआधी 24 ऑक्टोबरला 1200 किलो भेसळयुक्त खवा क्राईम ब्राँचने जप्त केला होता.धुळ्यात 2 हजार 400 किलो खवा जप्तधुळ्यामध्येही 2 हजार 400 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. धुळ्याच्या बस स्टँडवर उभ्या असलेल्या अहमदाबाद-भुसावळ बसच्या टपावर खव्याचे पार्सल ठेवण्यात आले होते. हा खवा गुजरातमधून आलेला होता. हा खवा अमरावती आणि लातूरला जाणार होता. अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागाने हा भेसळयुक्त खवा जप्त केला.बीडमध्ये 60 किलो खवा जप्तबीड बस स्थानकावरील पार्सल कार्यालयातही सोमवारी नवापूर इथून बीड आणि लातूृर साठी पाठविण्यात आलेल्या खव्यात भेसळ असल्याच्या संशयावरुन अन्न आणि औषध विभागाने त्यावर धाड टाकली. हा खवाअहमदाबाद इथल्या अंबिका कंपनीचा आहे. बीड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दूध आणि खवा भेसळीच्या घटना घडत आहे. अन्न आणि औषध विभागाने त्यावर सोमवारी धाड टाकली. बीड इथल्या गणेश स्वीट मार्ट इथून 60 किलो खवा जप्त केला. या खव्याच्या पिशवीवर कोणत्याही प्रकारचा ISI मार्क नाही. या प्रकरणी अन्न औषध विभाग नवापूर, जळगाव आणि अहमदाबाद इथे पुढील तपास करत आहे.बनावट खवा अस्सल खवा शुद्ध दुधापासून बनवला जातो. त्यामुळे त्याचा रंग पांढरा शुभ्र असतो. त्यात तुपाचा अंशही स्पष्टपणे जाणवतो. मात्र त्याचवेळी खव्यात भेसळ करताना अनेक केमिकल्स आणि शरीराला हानीकारक पदार्थ सर्रास मिसळले जातात.आणि या केमिकल्समुळे बनावट खव्याला हिरवट झाक असते. हा बनावट खवा तयार करताना घट्टपणा येण्यासाठी चक्क हाडांचा चुरा मिसळला जातो. त्यात बटाटे आणि युरियाही मिसळले जातात. कॉस्टिक सोडा आणि आरा रुट पावडर यांचाही, भेसळ करताना वापर केला जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2010 10:24 AM IST

28 ऑक्टोबर

ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादमध्ये आणखी 1640 किलो भेसळयुक्त खवा क्राईम ब्रांचने जप्त केला आहे.

खवा विक्री करणार्‍या गोपालसिंग पाल आणि राजुसिंग पाल या दोघांना सिडको परिसरातून दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.

दोघंही गुजरातचे असून शहरातल्या 50 व्यापार्‍यांना बनावट खवा विकल्याची कबुली दिली आहे.

क्राईम ब्रांचने कारवाई करत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील होराईझन्स कोल्ड स्टोरेज गोदामावर छापा मारुन 1640 किलो खवा जप्त केला आहे.

सणासुदीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा विक्रीसाठी येत आहे. याआधी 24 ऑक्टोबरला 1200 किलो भेसळयुक्त खवा क्राईम ब्राँचने जप्त केला होता.

धुळ्यात 2 हजार 400 किलो खवा जप्त

धुळ्यामध्येही 2 हजार 400 किलो खवा जप्त करण्यात आला आहे.

धुळ्याच्या बस स्टँडवर उभ्या असलेल्या अहमदाबाद-भुसावळ बसच्या टपावर खव्याचे पार्सल ठेवण्यात आले होते.

हा खवा गुजरातमधून आलेला होता. हा खवा अमरावती आणि लातूरला जाणार होता.

अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागाने हा भेसळयुक्त खवा जप्त केला.

बीडमध्ये 60 किलो खवा जप्त

बीड बस स्थानकावरील पार्सल कार्यालयातही सोमवारी नवापूर इथून बीड आणि लातूृर साठी पाठविण्यात आलेल्या खव्यात भेसळ असल्याच्या संशयावरुन अन्न आणि औषध विभागाने त्यावर धाड टाकली.

हा खवाअहमदाबाद इथल्या अंबिका कंपनीचा आहे. बीड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दूध आणि खवा भेसळीच्या घटना घडत आहे.

अन्न आणि औषध विभागाने त्यावर सोमवारी धाड टाकली.

बीड इथल्या गणेश स्वीट मार्ट इथून 60 किलो खवा जप्त केला. या खव्याच्या पिशवीवर कोणत्याही प्रकारचा ISI मार्क नाही.

या प्रकरणी अन्न औषध विभाग नवापूर, जळगाव आणि अहमदाबाद इथे पुढील तपास करत आहे.

बनावट खवा

अस्सल खवा शुद्ध दुधापासून बनवला जातो. त्यामुळे त्याचा रंग पांढरा शुभ्र असतो.

त्यात तुपाचा अंशही स्पष्टपणे जाणवतो. मात्र त्याचवेळी खव्यात भेसळ करताना अनेक केमिकल्स आणि शरीराला हानीकारक पदार्थ सर्रास मिसळले जातात.

आणि या केमिकल्समुळे बनावट खव्याला हिरवट झाक असते.

हा बनावट खवा तयार करताना घट्टपणा येण्यासाठी चक्क हाडांचा चुरा मिसळला जातो.

त्यात बटाटे आणि युरियाही मिसळले जातात. कॉस्टिक सोडा आणि आरा रुट पावडर यांचाही, भेसळ करताना वापर केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close