S M L

'आदर्श'ची जबाबदार राज्याची

02 नोव्हेंबरआदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी या घोटाळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर टाकली आहे. केंद्रांच्या पर्यावरण मंत्रालयाने सोसायटीबाबत दिलेल्या सूचनांचा राज्य सरकारने चुकीचा अर्थ लावला, असे रमेश यांनी म्हटले आहे. आदर्श सोसायटीची बिल्डिंग पाडण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी पर्यावरण मंत्री नव्हतो...- सुरेश प्रभू आदर्श सोसायटीला पर्यावरणविषय मंजुरी कुणी दिली हा वाद सध्या पेटला आहे. एनडीएचे तत्कालीन पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनीच ही परवानगी दिली होती, असा दावा काँग्रेस करत आहे. पण प्रभू यांनी याचा इन्कार केला आहे. 2003 मध्ये आदर्श सोसायटीला मंजुरी मिळाली, त्यावेळी प्रभू नव्हे तर द्रमुकचे टी. आर. बालू पर्यावरण मंत्री होते, असे आढळून आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2010 05:15 PM IST

02 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी या घोटाळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर टाकली आहे.

केंद्रांच्या पर्यावरण मंत्रालयाने सोसायटीबाबत दिलेल्या सूचनांचा राज्य सरकारने चुकीचा अर्थ लावला, असे रमेश यांनी म्हटले आहे. आदर्श सोसायटीची बिल्डिंग पाडण्याचा पर्याय खुला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मी पर्यावरण मंत्री नव्हतो...- सुरेश प्रभू

आदर्श सोसायटीला पर्यावरणविषय मंजुरी कुणी दिली हा वाद सध्या पेटला आहे. एनडीएचे तत्कालीन पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनीच ही परवानगी दिली होती, असा दावा काँग्रेस करत आहे.

पण प्रभू यांनी याचा इन्कार केला आहे. 2003 मध्ये आदर्श सोसायटीला मंजुरी मिळाली, त्यावेळी प्रभू नव्हे तर द्रमुकचे टी. आर. बालू पर्यावरण मंत्री होते, असे आढळून आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2010 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close