S M L

दूध भेसळ करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

03 नोव्हेंबरऐन सणासुदीच्या दिवसात सध्या सगळीकडे दूषित खवा पकडल्याच्या घटना वाढत असताना आता दूध भेसळीचे प्रकरणही कराडमध्ये उघडकीस आले आहे. सोयाबीन तेल आणि पावडरपासून दररोज सहा हजार लिटर दूध तयार करणार्‍या टोळीला कराडमधल्या मलकापूर इथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून 1 जण फरार आहे. दूषित दूधाचे 40 लीटरचे पंधरा कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय 18 बॉक्स पामतेल आणि 25 पोती पावडरंही ताब्यात घेतली. कराड इथल्या महाकाली दूध संकलन केंद्र आणि शिवामृत दूध संकलन केंद्र इथं दूध पाठवलं जात होते. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 09:15 AM IST

03 नोव्हेंबर

ऐन सणासुदीच्या दिवसात सध्या सगळीकडे दूषित खवा पकडल्याच्या घटना वाढत असताना आता दूध भेसळीचे प्रकरणही कराडमध्ये उघडकीस आले आहे.

सोयाबीन तेल आणि पावडरपासून दररोज सहा हजार लिटर दूध तयार करणार्‍या टोळीला कराडमधल्या मलकापूर इथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून 1 जण फरार आहे. दूषित दूधाचे 40 लीटरचे पंधरा कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय 18 बॉक्स पामतेल आणि 25 पोती पावडरंही ताब्यात घेतली.

कराड इथल्या महाकाली दूध संकलन केंद्र आणि शिवामृत दूध संकलन केंद्र इथं दूध पाठवलं जात होते. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close