S M L

पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं

03 नोव्हेंबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडलं आहे. शिवसेनेबरोबर युतीचा निर्णय चुकीचा होता असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीच्या निकालानंतर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनत चालले आहे. या पराभवाबद्दल समन्वय समितीत चर्चा करा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. महापौरपदाची निवडणुक व्हायच्या अगोदरच ही बैठक झाली पाहिजे अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. निकालाच्या दुसर्‍या दिवशी दैनिक सामनामधून भाजपच्या पराभवाची खिल्ली उडवली गेली होती. याबद्दलही समन्वय समितीमध्ये चर्चा झाली पाहीजे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 09:45 AM IST

03 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडलं आहे. शिवसेनेबरोबर युतीचा निर्णय चुकीचा होता असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीच्या निकालानंतर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनत चालले आहे.

या पराभवाबद्दल समन्वय समितीत चर्चा करा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. महापौरपदाची निवडणुक व्हायच्या अगोदरच ही बैठक झाली पाहिजे अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

निकालाच्या दुसर्‍या दिवशी दैनिक सामनामधून भाजपच्या पराभवाची खिल्ली उडवली गेली होती. याबद्दलही समन्वय समितीमध्ये चर्चा झाली पाहीजे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close