S M L

मनसेची भूमिका दोन दिवसात स्पष्ट करु - राज ठाकरे

03 नोव्हेंबरकल्याण डोंबिवली महानगरपालिका मतदान थोडसे जास्त झाले असते तर मनसेच्या हाती सत्ता आली असती असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवलीत मतदारांच्या दृष्टीकोनातून निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसात मनसेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत विजयी झालेले मनसेचे उमेदवार राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले होते. पहिल्याच प्रयत्नातच मनसेने कल्याण डोंबिवलीत 27 जागा जिंकल्याने या सर्व उमेदवारांचे मनोबल उंचावलं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात उत्तम काम करु असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 10:16 AM IST

03 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मतदान थोडसे जास्त झाले असते तर मनसेच्या हाती सत्ता आली असती असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवलीत मतदारांच्या दृष्टीकोनातून निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसात मनसेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत विजयी झालेले मनसेचे उमेदवार राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले होते.

पहिल्याच प्रयत्नातच मनसेने कल्याण डोंबिवलीत 27 जागा जिंकल्याने या सर्व उमेदवारांचे मनोबल उंचावलं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात उत्तम काम करु असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close