S M L

सेहवाग-द्रविडची सेंच्युरी

04 नोव्हेंबरअहमदाबाद टेस्टमध्ये भारतीय टीम रन्सची दिवाळी साजरी करत आहे. विरेंद्र सेहवाग पाठोपाठ राहूल द्रविडनेही आपली सेंच्युरी पूर्ण केली आहे. द वॉल द्रविडने तेरा फोर मारत शानदार सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली ही त्याची 30 वी सेंच्युरी ठरली आहे 145 टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 30 सेंच्युरीजचा टप्पा पार करणारा द्रविड हा जगातला आठवा तर भारताचा तिसरा बॅट्समन ठरला आहे. 104 रन्सवर असताना ख्रिस मार्टिनने त्याची विकेट घेतली. याआधी सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. त्याआधी अहमदाबाद टेस्टमध्ये द्रविडने वीरेंद्र सेहवागबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 237 रन्सची भक्कम पार्टनरशिप केली. सेहवाग 173 रन्सवरआऊट झाला. आता मैदानावर द्रविडच्या साथीला सचिन तेंडुलकर मैदानात आला आहे. सचिनच्या सेंच्युरीच्या हाफसेंच्युरीची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमीना लागली आहे. सेहवाग आणि द्रविडने मिळून दुसर्‍या विकेटसाठी दिडशेच्या वर नाबाद पार्टनरशिप केली आहे. राहूल द्रविडने संयमी खेळ करत 152 बॉल्समध्ये कारकिर्दीतली 60वी हाफ सेंच्युरी ठोकली. दुसरीकडे सेहवागने कारकिर्दीतली 22वी सेंच्युरी ठोकली. सेहवागने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत 111 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2010 11:46 AM IST

04 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्टमध्ये भारतीय टीम रन्सची दिवाळी साजरी करत आहे. विरेंद्र सेहवाग पाठोपाठ राहूल द्रविडनेही आपली सेंच्युरी पूर्ण केली आहे. द वॉल द्रविडने तेरा फोर मारत शानदार सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली ही त्याची 30 वी सेंच्युरी ठरली आहे

145 टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 30 सेंच्युरीजचा टप्पा पार करणारा द्रविड हा जगातला आठवा तर भारताचा तिसरा बॅट्समन ठरला आहे.

104 रन्सवर असताना ख्रिस मार्टिनने त्याची विकेट घेतली. याआधी सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे.

त्याआधी अहमदाबाद टेस्टमध्ये द्रविडने वीरेंद्र सेहवागबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 237 रन्सची भक्कम पार्टनरशिप केली. सेहवाग 173 रन्सवरआऊट झाला.

आता मैदानावर द्रविडच्या साथीला सचिन तेंडुलकर मैदानात आला आहे. सचिनच्या सेंच्युरीच्या हाफसेंच्युरीची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमीना लागली आहे.

सेहवाग आणि द्रविडने मिळून दुसर्‍या विकेटसाठी दिडशेच्या वर नाबाद पार्टनरशिप केली आहे. राहूल द्रविडने संयमी खेळ करत 152 बॉल्समध्ये कारकिर्दीतली 60वी हाफ सेंच्युरी ठोकली.

दुसरीकडे सेहवागने कारकिर्दीतली 22वी सेंच्युरी ठोकली. सेहवागने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत 111 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2010 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close