S M L

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारतभेट

गेल्या 5 दशकांमध्ये भारतभेटीला येणारे बराक ओबामा हे सहावे अमेरिकन अध्यक्ष आहेत.1959 : ड्वीट डी.आयसनहॉवरजवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1959 मध्ये ड्वीट डी.आयसनहॉवर यांनी भारताला भेट दिली होती. ही भेट आशियाई दौ-याचा एक भाग होती. यावेळी त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. भारताच्या अलिप्ततावादी धोरणाला अमेरिकेचा विरोध होता. आयसेनहॉवर यांचे पंडित नेहरूंशी संबंध चांगले असूनही या दोन्ही देशांच्या संबंधाला चालना मिळू शकली नाही. उलट याच काळात सोव्हियत रशियासोबतच्या शीतयुद्धात अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या गटात घेतलं. जुलै 1969 : रिचर्ड निक्सन अमेरिकेचे 37वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एक दिवसाचा भारत दौरा केला. त्यांची ही भारतभेट होती 22 तासांची. निक्सन यांची भेट घेताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत हा अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीचा भाग असल्याची भूमिका मांडली. पण या भेटीचा फारसा फायदा झाला नाही. रिचर्ड निक्सन यांच्या मते हि भेट अर्थहीन होती. पण ती अनेकांच्या स्मरणात राहीली ती निक्सन यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजरशी जो संवाद केला त्याविषयी. निक्सन यांनी इंदिरा गांधींचा उल्लेख करताना म्हातारी चेटकीन असा उल्लेख केला होता तर किसिंजर यांनी भारतीयांना बास्टर अशी शिव्यांची लाखोली वाहीली. जानेवारी 1978 : जिमी कार्टरआपल्या तीन दिवसांच्या भारत भेटीत त्यांचा दोन दिवस मुक्काम दिल्लीत होता. तर एक दिवस हरयाणामध्ये. या दौ-यादरम्यान भारताचे त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांची त्यांनी भेट घेतली. कार्टरनी या भेटीबद्दल बोलताना नंतर म्हटलं की भारताने अणूउर्जेच्या धोरणांवरुन वाईट संकेत दिले. तिस-या दिवशी हरयाणातील एका खेड्याला कार्टर यांनी भेट दिली त्या खेड्याचं नाव पुढे कार्टरपुरी असं झालं. मार्च 2000 : बिल क्लिंटन बिल क्लिंटन हे भारताला भेट देणारे चौथे अध्यक्ष. 2000 मध्ये भारतात दौ-यावर आलेले क्लिंटन भारतात अधिक लोकप्रिय झाले. भारत-अमेरिका संबंध सुधारायला या भेटीमुळे मदत झाली असं म्हटलं जातं. मानवी हक्काला पाठींबा असणारे राज्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. 1998 साली भारताने स्वतंत्रपणे पोखरण इथे अणूचाचणी करुन आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे या भेटीलाही अनेक संदर्भ होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर बलाढ्य अमेरिकेसमोर स्वत:चं अस्तित्व भारताने सिद्ध केलं होतं. याशिवाय आयटी क्रांतीमध्ये भारताने आपली ताकद दाखवली होती. क्लिंटन यांच्या भेटीमुळे जागतिक पातळीवर भारताची दखल घेणं भाग पडलं. भारतभेट आटपून क्लिंटन काही तासांसाठी पाकिस्तानलाही गेले. मार्च 2006 : जॉर्ज डब्ल्यु बुश शीतयुद्धानंतर एकमेकांविषयी असलेले पूर्वग्रह दूर सारून भारत-अमेरिका संबधांत एक पाऊल पुढे टाकलं गेलं. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुकरारावर सही केली. भारत-पाक अणूउर्जा कराराला पाठींबा देणा-या अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतातही गुडवील मिळवण्यात यश आलं. तीन दिवसांच्या वास्तव्यात बुश यांना तीव्र निदर्शनांनाही सामोरं जावं लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2010 06:00 AM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारतभेट

गेल्या 5 दशकांमध्ये भारतभेटीला येणारे बराक ओबामा हे सहावे अमेरिकन अध्यक्ष आहेत.

1959 : ड्वीट डी.आयसनहॉवर

जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1959 मध्ये ड्वीट डी.आयसनहॉवर यांनी भारताला भेट दिली होती. ही भेट आशियाई दौ-याचा एक भाग होती. यावेळी त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. भारताच्या अलिप्ततावादी धोरणाला अमेरिकेचा विरोध होता. आयसेनहॉवर यांचे पंडित नेहरूंशी संबंध चांगले असूनही या दोन्ही देशांच्या संबंधाला चालना मिळू शकली नाही. उलट याच काळात सोव्हियत रशियासोबतच्या शीतयुद्धात अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या गटात घेतलं.

जुलै 1969 : रिचर्ड निक्सन

अमेरिकेचे 37वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एक दिवसाचा भारत दौरा केला. त्यांची ही भारतभेट होती 22 तासांची. निक्सन यांची भेट घेताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत हा अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीचा भाग असल्याची भूमिका मांडली. पण या भेटीचा फारसा फायदा झाला नाही. रिचर्ड निक्सन यांच्या मते हि भेट अर्थहीन होती. पण ती अनेकांच्या स्मरणात राहीली ती निक्सन यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजरशी जो संवाद केला त्याविषयी. निक्सन यांनी इंदिरा गांधींचा उल्लेख करताना म्हातारी चेटकीन असा उल्लेख केला होता तर किसिंजर यांनी भारतीयांना बास्टर अशी शिव्यांची लाखोली वाहीली.

जानेवारी 1978 : जिमी कार्टर

आपल्या तीन दिवसांच्या भारत भेटीत त्यांचा दोन दिवस मुक्काम दिल्लीत होता. तर एक दिवस हरयाणामध्ये. या दौ-यादरम्यान भारताचे त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांची त्यांनी भेट घेतली. कार्टरनी या भेटीबद्दल बोलताना नंतर म्हटलं की भारताने अणूउर्जेच्या धोरणांवरुन वाईट संकेत दिले. तिस-या दिवशी हरयाणातील एका खेड्याला कार्टर यांनी भेट दिली त्या खेड्याचं नाव पुढे कार्टरपुरी असं झालं.

मार्च 2000 : बिल क्लिंटन

बिल क्लिंटन हे भारताला भेट देणारे चौथे अध्यक्ष. 2000 मध्ये भारतात दौ-यावर आलेले क्लिंटन भारतात अधिक लोकप्रिय झाले. भारत-अमेरिका संबंध सुधारायला या भेटीमुळे मदत झाली असं म्हटलं जातं. मानवी हक्काला पाठींबा असणारे राज्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. 1998 साली भारताने स्वतंत्रपणे पोखरण इथे अणूचाचणी करुन आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे या भेटीलाही अनेक संदर्भ होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर बलाढ्य अमेरिकेसमोर स्वत:चं अस्तित्व भारताने सिद्ध केलं होतं. याशिवाय आयटी क्रांतीमध्ये भारताने आपली ताकद दाखवली होती. क्लिंटन यांच्या भेटीमुळे जागतिक पातळीवर भारताची दखल घेणं भाग पडलं. भारतभेट आटपून क्लिंटन काही तासांसाठी पाकिस्तानलाही गेले.

मार्च 2006 : जॉर्ज डब्ल्यु बुश

शीतयुद्धानंतर एकमेकांविषयी असलेले पूर्वग्रह दूर सारून भारत-अमेरिका संबधांत एक पाऊल पुढे टाकलं गेलं. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुकरारावर सही केली. भारत-पाक अणूउर्जा कराराला पाठींबा देणा-या अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतातही गुडवील मिळवण्यात यश आलं. तीन दिवसांच्या वास्तव्यात बुश यांना तीव्र निदर्शनांनाही सामोरं जावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2010 06:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close