S M L

ए राजा यांची काँग्रेसकडून पाठराखण

12 नोव्हेंबर2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून अडचणीत आलेल्या ए राजा यांची अखेर काँग्रेसला पाठराखण करावी लागली. कॅगच्या अहवालात राजा यांच्यावर थेट आरोप नसल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. राजा यांनीसुद्धा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या हट्टापुढे काँग्रेस आणि यूपीए सरकार हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.2-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यावरून सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले पण काही झालं तरी राजीनामा देणार नाही, या भूमिकेवर राजा अडून बसले. त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेचं कारण स्पष्ट आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा खुद्द करुणानिधी यांचा पाठिंबा आहे.द्रमुक हा यूपीए आघाडीतला तिसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे सत्तेची चिंता करत सरकार आणि काँग्रेसला नाईलाजाने राजा यांना पाठिंशी घालावे लागते.राजा हे तामिळनाडूतले द्रमुकचे दलित चेहरा आहेत. आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचा त्यांच्यावर कमालीचा विश्वास आहे. राजा यांची खुर्ची काढून घेणं म्हणजे भ्रष्टाचाराची कबुली देणं, असा त्याचा अर्थ होईल. आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसेल, अशी भीती द्रमुकला वाटत आहे त्यामुळेच निर्णय काय घ्यायचा याचा पेच पंतप्रधानांपुढे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 05:23 PM IST

ए राजा यांची काँग्रेसकडून पाठराखण

12 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून अडचणीत आलेल्या ए राजा यांची अखेर काँग्रेसला पाठराखण करावी लागली. कॅगच्या अहवालात राजा यांच्यावर थेट आरोप नसल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली.

राजा यांनीसुद्धा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या हट्टापुढे काँग्रेस आणि यूपीए सरकार हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

2-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यावरून सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले पण काही झालं तरी राजीनामा देणार नाही, या भूमिकेवर राजा अडून बसले.

त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेचं कारण स्पष्ट आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा खुद्द करुणानिधी यांचा पाठिंबा आहे.

द्रमुक हा यूपीए आघाडीतला तिसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे सत्तेची चिंता करत सरकार आणि काँग्रेसला नाईलाजाने राजा यांना पाठिंशी घालावे लागते.

राजा हे तामिळनाडूतले द्रमुकचे दलित चेहरा आहेत. आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचा त्यांच्यावर कमालीचा विश्वास आहे.

राजा यांची खुर्ची काढून घेणं म्हणजे भ्रष्टाचाराची कबुली देणं, असा त्याचा अर्थ होईल. आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसेल, अशी भीती द्रमुकला वाटत आहे त्यामुळेच निर्णय काय घ्यायचा याचा पेच पंतप्रधानांपुढे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close