S M L

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचं वर्चस्व

13 नोव्हेंबरजळगांवला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना एका अपक्षाने दिलेल्या तगड्या आव्हानामुळे ही निवडणुक जोरदार गाजणार असल्याची शक्यता आहे.आणि विशेष म्हणजे सर्वच उमेदवार हे प्रस्थापीत राजकारण्यांचे नातेवाईक असल्याने राजकीय घराणेशाहीने जिल्ह्यांत डोकं वर काढले आहेत.विधानपरिषदेसाठी सेनेचा दावा मोडित काढत एकनाथ खडसेंनी ही जागा भाजपकडे खेचली खरी पण सध्याचे भाजप आमदार गुरुमुख जगवाणींचे तिकीट मात्र कापले आहे. आणि अपेक्षेप्रमाणे खडसेंनी त्यांच्या मुलासाठी अर्थात निखिलसाठी तिकीट मिळवले आहेत. त्यामुळे गोपिनाथ मुडेंनंतर त्याच्यावरही घराणेशाहीचा आरोप होत आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये प्रबळदावेदार मनीष जैन त्याचं तिकीट कापलं गेले आहे. उमेदवार अनिल चौधरींचा मोठा भाऊ आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यायशस्वी राजकीय खेळीनंचे हे शक्य झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या वडिलांना म्हणजे ईश्वरलाल जैन यांनाही आपल्यासाठी तिकीट न मिळवता आल्याने त्यांनी बंडखोरी केली. पण ही घराणेशाही नाही तर मी अपक्षांचा उमेदवार आहे असा दावा त्यांनी केला आहे.एकंदरीत पुत्र आणि बंधुप्रेमामुळे आता ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली आहे. पण या निवडणुकीत बाजी कोणीही मारो, विजय हा घराणेशाहीचाच होणार हे नक्की आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 11:28 AM IST

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचं वर्चस्व

13 नोव्हेंबर

जळगांवला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना एका अपक्षाने दिलेल्या तगड्या आव्हानामुळे ही निवडणुक जोरदार गाजणार असल्याची शक्यता आहे.

आणि विशेष म्हणजे सर्वच उमेदवार हे प्रस्थापीत राजकारण्यांचे नातेवाईक असल्याने राजकीय घराणेशाहीने जिल्ह्यांत डोकं वर काढले आहेत.

विधानपरिषदेसाठी सेनेचा दावा मोडित काढत एकनाथ खडसेंनी ही जागा भाजपकडे खेचली खरी पण सध्याचे भाजप आमदार गुरुमुख जगवाणींचे तिकीट मात्र कापले आहे.

आणि अपेक्षेप्रमाणे खडसेंनी त्यांच्या मुलासाठी अर्थात निखिलसाठी तिकीट मिळवले आहेत. त्यामुळे गोपिनाथ मुडेंनंतर त्याच्यावरही घराणेशाहीचा आरोप होत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये प्रबळदावेदार मनीष जैन त्याचं तिकीट कापलं गेले आहे. उमेदवार अनिल चौधरींचा मोठा भाऊ आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यायशस्वी राजकीय खेळीनंचे हे शक्य झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या वडिलांना म्हणजे ईश्वरलाल जैन यांनाही आपल्यासाठी तिकीट न मिळवता आल्याने त्यांनी बंडखोरी केली. पण ही घराणेशाही नाही तर मी अपक्षांचा उमेदवार आहे असा दावा त्यांनी केला आहे.

एकंदरीत पुत्र आणि बंधुप्रेमामुळे आता ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली आहे. पण या निवडणुकीत बाजी कोणीही मारो, विजय हा घराणेशाहीचाच होणार हे नक्की आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close