S M L

भारताची न्युझीलंडवर 86 रन्सने आघाडी

14 नोव्हेंबरहैदराबाद टेस्टमध्ये तिसर्‍या दिवसाची भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसर्‍या दिवसअखेर 11 रन्सवर नॉटआऊट असणार्‍या सचिन तेंडुलकरला आज केवळ 2 रन्स करता आले.मात्र नंतर हरभजन सिंगने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने न्युझीलंडवर 86 रन्सची दमदार आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये भारताने 9 विकेट गमावत 436 रन्स केले. हरभजन सिंगने एस श्रीसंतबरोबर दहाव्या विकेटसाठी 69 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. तिसर्‍या दिवसअखेर हरभजन सिंग 85 तर एस श्रीसंत 14 रन्सवर नॉटआऊट खेळत आहेत. दुसर्‍या दिवसअखेर 11 रन्सवर नॉटआऊट असणार्‍या सचिन तेंडुलकरला आज केवळ 2 रन्स करता आले. व्हिटोरीने सचिनला 13 रन्सवर आऊट केले. यानंतर राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मणने सावध बॅटिंग करत भारताचा स्कोर वाढवला. पण टीम साऊदीने द्रविडला आऊट करत ही जोडी फोडली. द्रविडने 45 रन्स केले. सुरेश रैना आणि महेंद्र सिंग धोनी फार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पण आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार्‍या व्ही व्ही एस लक्ष्मणने मात्र 74 रन्सची शानदार खेळी केली. न्युझीलंडतर्फे व्हिटोरीने 4 तर साऊदीने 3 विकेट घेतल्या. टेस्ट मॅचचे आणखी दोन दिवस बाकी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 03:11 PM IST

भारताची न्युझीलंडवर 86 रन्सने आघाडी

14 नोव्हेंबर

हैदराबाद टेस्टमध्ये तिसर्‍या दिवसाची भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसर्‍या दिवसअखेर 11 रन्सवर नॉटआऊट असणार्‍या सचिन तेंडुलकरला आज केवळ 2 रन्स करता आले.

मात्र नंतर हरभजन सिंगने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने न्युझीलंडवर 86 रन्सची दमदार आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये भारताने 9 विकेट गमावत 436 रन्स केले.

हरभजन सिंगने एस श्रीसंतबरोबर दहाव्या विकेटसाठी 69 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. तिसर्‍या दिवसअखेर हरभजन सिंग 85 तर एस श्रीसंत 14 रन्सवर नॉटआऊट खेळत आहेत.

दुसर्‍या दिवसअखेर 11 रन्सवर नॉटआऊट असणार्‍या सचिन तेंडुलकरला आज केवळ 2 रन्स करता आले. व्हिटोरीने सचिनला 13 रन्सवर आऊट केले.

यानंतर राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मणने सावध बॅटिंग करत भारताचा स्कोर वाढवला. पण टीम साऊदीने द्रविडला आऊट करत ही जोडी फोडली.

द्रविडने 45 रन्स केले. सुरेश रैना आणि महेंद्र सिंग धोनी फार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

पण आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार्‍या व्ही व्ही एस लक्ष्मणने मात्र 74 रन्सची शानदार खेळी केली.

न्युझीलंडतर्फे व्हिटोरीने 4 तर साऊदीने 3 विकेट घेतल्या. टेस्ट मॅचचे आणखी दोन दिवस बाकी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close