S M L

राज्यात अवकाळी पावसाचा कहर

15 नोव्हेंबरगेल्या काही दिसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.द्राक्ष, सोयाबिन, कांदा, कापूस, ज्वारी आणि धान पिकाला याचा फटका बसला आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडली तर वेचणीस आलेल्या कापूस ओला झाल्याने त्याचा भाव कमी होता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पावसाच्या फटक्याने याही वर्षी जुन्नरच्या द्राक्ष बागांना फटका बसला. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष बागायतदार अवकाळी पावसाचे बळी पडत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने झोडपल्याने ऐन हंगाम बहरण्यापूर्वीच पिकांचे नुकसान झाले आहे. लहान द्राक्षांची घडं कुजण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बुरशी नाशकांची फवारणी करण्यातच शेतकर्‍यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पावसांने झोडपले आणि सरकारने अडवल तर सांगणार कोणाला अशी परिस्थिती द्राक्ष बागायतदारांची झाली आहे. नाशिकमध्ये कांदा सडलानाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 45 हजार हेक्टर क्षेत्रातल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर 25 हजार एकरावरचा कांदाही नासला. ऐन मणीधरणाचा ऐन मोसम असताना द्राक्ष बागायतदांना फटका बसला. कांद्याचेही भाव वाढत असताना अचानक आलेल्या पावसामुळे हातातला घास काढून घेतला आहे. याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 30 ते 40 रुपये किलो पर्यंत पोहचले आहे. एकट्या मालेगावमध्ये पाच हजार हेक्टरवरचा कांदा सडला आहे. तर 2 हजार हेक्टरवर घेतलेल्या कांद्यांच्या नवीन रोपांनाही याचा फटका बसला आहे.बीडमध्ये नदीच्या पुरात एक तरुण वाहून गेला बीड जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. याच नदीवर असलेल्या पुलाचे काम गेली 6 महिने रखडलेले असल्यांने नागरिक संतापले. आणि त्यांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. वाशीममध्ये सोयाबीनच नुकसानअवकाळी पावसाचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना चांगलाच बसला आहे. पावसामुळे वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेली शेकडो सोयाबीनची पोती भिजली.या वर्षी सोयाबीनचे विक्रमी पिक झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षी विक्रमी 20 हजार पोती सोयाबीनची आवक वाढली आहे. योग्य सुविधा नसल्यामुळे लाखो रुपयाचा फटका सहन करावा लागल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.गोंदियात शेतकरी हतबलधान उत्पादक म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धान्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे धान्यपिकांचे नुकसान झाले त्याचे सर्वेक्षण करण्याकरता जिल्हाधिका-यांनी कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिका-यांना तत्काळ सुचना दिल्या. सरकारी आकड्यानुसार 20-25 टक्के एवढे धानपिकाचे नुकसान झाले आहे. धानपिकाचे जर 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते. परंतू प्रत्यक्षात 25 टक्के एवढे झालेले शेतक-यांचे नुकसान कोण भरुन काढेल ,यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 10:15 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचा कहर

15 नोव्हेंबर

गेल्या काही दिसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

द्राक्ष, सोयाबिन, कांदा, कापूस, ज्वारी आणि धान पिकाला याचा फटका बसला आहे.

पावसामुळे ज्वारी काळी पडली तर वेचणीस आलेल्या कापूस ओला झाल्याने त्याचा भाव कमी होता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

अवकाळी पावसाच्या फटक्याने याही वर्षी जुन्नरच्या द्राक्ष बागांना फटका बसला. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष बागायतदार अवकाळी पावसाचे बळी पडत आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने झोडपल्याने ऐन हंगाम बहरण्यापूर्वीच पिकांचे नुकसान झाले आहे. लहान द्राक्षांची घडं कुजण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

बुरशी नाशकांची फवारणी करण्यातच शेतकर्‍यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पावसांने झोडपले आणि सरकारने अडवल तर सांगणार कोणाला अशी परिस्थिती द्राक्ष बागायतदारांची झाली आहे.

नाशिकमध्ये कांदा सडला

नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 45 हजार हेक्टर क्षेत्रातल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर 25 हजार एकरावरचा कांदाही नासला.

ऐन मणीधरणाचा ऐन मोसम असताना द्राक्ष बागायतदांना फटका बसला. कांद्याचेही भाव वाढत असताना अचानक आलेल्या पावसामुळे हातातला घास काढून घेतला आहे.

याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 30 ते 40 रुपये किलो पर्यंत पोहचले आहे. एकट्या मालेगावमध्ये पाच हजार हेक्टरवरचा कांदा सडला आहे.

तर 2 हजार हेक्टरवर घेतलेल्या कांद्यांच्या नवीन रोपांनाही याचा फटका बसला आहे.

बीडमध्ये नदीच्या पुरात एक तरुण वाहून गेला

बीड जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

याच नदीवर असलेल्या पुलाचे काम गेली 6 महिने रखडलेले असल्यांने नागरिक संतापले. आणि त्यांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या.

वाशीममध्ये सोयाबीनच नुकसान

अवकाळी पावसाचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना चांगलाच बसला आहे. पावसामुळे वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेली शेकडो सोयाबीनची पोती भिजली.

या वर्षी सोयाबीनचे विक्रमी पिक झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षी विक्रमी 20 हजार पोती सोयाबीनची आवक वाढली आहे.

योग्य सुविधा नसल्यामुळे लाखो रुपयाचा फटका सहन करावा लागल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

गोंदियात शेतकरी हतबल

धान उत्पादक म्हणून ओळखल्या जाणा-या गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धान्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे धान्यपिकांचे नुकसान झाले त्याचे सर्वेक्षण करण्याकरता जिल्हाधिका-यांनी कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिका-यांना तत्काळ सुचना दिल्या.

सरकारी आकड्यानुसार 20-25 टक्के एवढे धानपिकाचे नुकसान झाले आहे. धानपिकाचे जर 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

परंतू प्रत्यक्षात 25 टक्के एवढे झालेले शेतक-यांचे नुकसान कोण भरुन काढेल ,यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close