S M L

मॅक्युलमच्या सेंच्युरीसह न्युझीलंडची 115 धावांची आघाडी

15 नोव्हेंबरहैदराबाद टेस्टमध्ये आता चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.दुसर्‍या इनिंगमध्ये न्युझीलंडने 115 रन्सची आघाडी घेतली आहे. पण त्यांचे प्रमुख चार बॅट्समन पॅव्हेलिअमध्ये परतले आहे. मॅचचा शेवटचा दिवस बाकी असून न्युझीलंडची इनिंग झटपट गुंडाळण्याचे आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असणार आहे. न्युझीलंडतर्फे ब्रँडम मॅक्युलमने शानदार सेंच्युरी ठोकत न्युझीलंडला आघाडी मिळवून दिली. चौथ्या दिवसअखेर मॅक्युलम 124 रन्सवर नॉटआऊट असून विलिम्सनं 12 रन्स करत त्याला साथ देत दुसर्‍या इनिंगमध्ये न्युझीलंडची सुरुवात चांगली झाली. मॅकेन्टोश आणि मॅक्युलमनं पहिल्या विकेटसाठी 125 रन्सची पार्टनरशिप केली. प्रग्यान ओझाने मॅकेन्टॉशला आऊट करत ही जोडी फोडली. आणि यानंतर भारतीय बॉलर्सनं मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर आणि जेसी रायडर या खेळाडुना झटपट आऊट केले. प्रग्यान ओझानं 2 तर एस श्रीसंत आणि सुरेश रैनानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्याआधी भारताची पहिली इनिंग 476 रन्सवर आटोपली. हरभजन सिंगने केलेल्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारतानं 122 रन्सची भक्कम आघाडी घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2010 05:33 PM IST

मॅक्युलमच्या सेंच्युरीसह न्युझीलंडची 115 धावांची आघाडी

15 नोव्हेंबर

हैदराबाद टेस्टमध्ये आता चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.दुसर्‍या इनिंगमध्ये न्युझीलंडने 115 रन्सची आघाडी घेतली आहे.

पण त्यांचे प्रमुख चार बॅट्समन पॅव्हेलिअमध्ये परतले आहे. मॅचचा शेवटचा दिवस बाकी असून न्युझीलंडची इनिंग झटपट गुंडाळण्याचे आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असणार आहे.

न्युझीलंडतर्फे ब्रँडम मॅक्युलमने शानदार सेंच्युरी ठोकत न्युझीलंडला आघाडी मिळवून दिली. चौथ्या दिवसअखेर मॅक्युलम 124 रन्सवर नॉटआऊट असून विलिम्सनं 12 रन्स करत त्याला साथ देत दुसर्‍या इनिंगमध्ये न्युझीलंडची सुरुवात चांगली झाली.

मॅकेन्टोश आणि मॅक्युलमनं पहिल्या विकेटसाठी 125 रन्सची पार्टनरशिप केली.

प्रग्यान ओझाने मॅकेन्टॉशला आऊट करत ही जोडी फोडली. आणि यानंतर भारतीय बॉलर्सनं मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर आणि जेसी रायडर या खेळाडुना झटपट आऊट केले.

प्रग्यान ओझानं 2 तर एस श्रीसंत आणि सुरेश रैनानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्याआधी भारताची पहिली इनिंग 476 रन्सवर आटोपली. हरभजन सिंगने केलेल्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारतानं 122 रन्सची भक्कम आघाडी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2010 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close