S M L

कणकवलीत तापाचे आठ बळी

16 नोव्हेंबरगेल्या महिन्याभरापासून सिंधुदुर्गातला कणकवली तालुका लेप्टो स्पायरेसीस या जीवघेण्या तापाच्या विळख्यात सापडला. या तापाने आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे. खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतांनाही आणखी काहीजण दगावल्याची भिती आहे.जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये लेप्टोस्पायरेसीसचे 34 रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. मात्र अजूनही या उपचारासाठी आवश्यक असलेली प्लेटलेट सेपरेटर यंत्रणा कार्यरत झालेली नाही. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिरजेतील तीन तज्ञ डॉक्टरांचे पथक आज कणकवलीत दाखल होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2010 10:34 AM IST

कणकवलीत तापाचे आठ बळी

16 नोव्हेंबर

गेल्या महिन्याभरापासून सिंधुदुर्गातला कणकवली तालुका लेप्टो स्पायरेसीस या जीवघेण्या तापाच्या विळख्यात सापडला. या तापाने आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे.

खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतांनाही आणखी काहीजण दगावल्याची भिती आहे.जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये लेप्टोस्पायरेसीसचे 34 रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.

मात्र अजूनही या उपचारासाठी आवश्यक असलेली प्लेटलेट सेपरेटर यंत्रणा कार्यरत झालेली नाही. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिरजेतील तीन तज्ञ डॉक्टरांचे पथक आज कणकवलीत दाखल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close