S M L

रांगोळीची मनमोहक रुपे

30 ऑक्टोबर, मुंबईशिल्पा गाडदिवाळीच्या आनंदात खरे रंग भरते रांगोळी. गावोगावी शेणानं सारवलेल्या जमिनीवर पूर्वी काढली जाणारी रांगोळी, मग हळूच फ्लॅट्सच्या टाइल्सवर कधी विसावली ते कळलंच नाही. ठिपक्यांची रांगोळी ही सर्वात जुनी. पण हळूहळू रांगोळीतही अनेक बदल होत गेले.रांगोळीची अनेक मनमोहक रुपं आहेत. हाताला रंगाची जोड आणि त्यातून उमटणारे आकर्षक आकार. मूळ नाव रंगवल्ली. संस्कार भारतीची रांगोळी सध्या खूपच लोकप्रिय आहे. पण हा ट्रेंड नवा नाही. खूप पूर्वीपासूनच संस्कार भारतीची रांगोळी प्रसिद्ध होती. पण मध्ये काही काळ ती लुप्त झाली होती आणि आता ती पुन्हा प्रसिद्ध झाली आहे.जसा प्रांत बदलतो तशी रांगोळीची नावं आणि प्रकारही. जसं बंगाल तांदळाच्या पिठापासून काढल्या जाणार्‍या रांगोळीला अल्पना म्हणतात. ओरिसात वल्लरीप्रधान म्हणजे पानाफुला फळांची चित्र असलेली रांगोळी. रांगोळीतही मॉडर्न आर्ट आहे आणि ते म्हणजे व्यक्तिचित्र किंवा पोर्टेट्स पण यासाठी लागणारं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. रांगोळी आर्टिस्ट शिल्पा शेट्ये म्हणाली, ' त्यासाठी खूप पेशन्स हवेत. पण काम झालं की समाधानही मिळतं मग बरं वाटतं. ' थ्रीडी आर्ट हा रांगोळीतला अगदी अलीकडचा प्रकार. जितका मनमोहक तितकाच अवघड. ही रांगोळी रेखाटताना खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं कारण जर रांगोळी जास्त पडली तर चित्र खराब होऊ शकतं. या रांगोळीने स्कल्पचर, कार्टूनिस्ट अशा वेगवेगळ्या आर्टिस्टचंही लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 11:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close